पठाणकोटमार्गे दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत आहेत.
वृत्तसंस्था/ पठाणकोट
पाकिस्तान पुन्हा एकदा नव्या वर्षात पंजाबमध्ये दहशतवाद फैलावण्याचा कट रचत आहे. पाकिस्तानने पंजाबमार्गे घुसखोरी करविण्यासाठी दहशतवाद्यांना तयार केले असून त्यांच्या मदतीसाटी सीमाक्षेत्रातील स्पीलर सेल सक्रीय केले आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या इनपूटच्या आधारावर पंजाब पोलिसांनी गंदला लाहडी क्षेत्रातून दहशतवादी बिल्लू गुज्जरला ताब्यात घेतले आहे. तर दुसरा दहशतवादी नजाकत हुसैन सध्या बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जातोय.
बिल्लूला संशयास्पद कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले असून अन्य आरोपांप्रकरणी तपास सुरू आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटना पुन्हा एकदा पठाणकोटमध्ये मोठा हल्ला करण्याचा कट रचत आहेत. गुप्तचर यंत्रणांनुसार काही दहशतवादी जम्मू-काश्मीर आणि पठाणकोटमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दलजिंदर सिंह यांनी सांगितले.
कटाचा सूत्रधार मुजफ्फर आझाद
या दहशतवाद्यांचा उद्देश पठाणकोट वायूतळ, रेल्वेस्थानक आणि अन्य महत्त्वपूर्ण स्थानांवर हल्ला करणे आहे. या कटाचा सूत्रधार पाकिस्तानी नागरिक मुजफ्फर अहमद असून तो पठाणकोटमध्ये दहशतवादी कारवाया घडवून आणण्यासाठी दहशतवादी नेटवर्क चालवत आहे. 25-31 डिसेंबदरम्यान हल्ल्याचा प्रयत्न होऊ शकतो असा इनपूट गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. दहतशवाद्यांनी परस्परांमध्ये संपर्कासाठी व्हर्च्युअल क्रमांकांचा वापर केल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड ठरत आहे.
महत्त्वाच्या ठिकाणांवर नजर
गुप्तचर यंत्रणांनी दोन प्रमुख इनपूट दिले आहेत. पहिल्या इनपूटमध्ये 17-18 डिसेंबरच्या रात्री तीन दहशतवादी स्वत:चे स्थानिक सहाय्यक बिल्लु गुज्जर आणि नजाकत हुसैनच्या मदतीने पठाणकोटमध्ये घुसखोरी करतील असा होता. पठाणकोटमधील सैन्यतळ आणि वायुतळावर हल्ला करण्याचा कट या दहशतवाद्यांनी रचला आहे. यामुळे सुरक्षा वाढवत पठाणकोटमध्ये पोलीस, सैन्य आणि विशेष कमांडेंना तैनात करण्यात आले आहे. पठाणकोटमध्ये स्लीपरचे सेलचे सदस्य रेकी करत असल्याचा दुसरा इनपूट होता.
Comments are closed.