Terrorists have no time to ask religion congress leader on pahalgam attack in marathi


पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरात संताप असतानाच वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, हरयाणासह अनेक राज्यांमधील पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून घेत मग गोळ्या घातल्याच्या बातम्यांवर वडेट्टीवार म्हणाले की, हे चुकीचे वृत्त आहे. दहशतवाद्यांकडे एवढा वेळ असतो का, की ते कोणाच्या कानात जाऊन धर्म विचारतील आणि गोळ्या घालतील.

Vijay Wadettiwar On Pahalgam Attack : मुंबई : दक्षिण काश्मिरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये बैसरन खोऱ्यात मंगळवारी दुपारी दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा समावेश आहे. या हल्ल्याने संपू्र्ण देश हादरला. पहलगामला आलेल्या या पर्यटकांच्या कुटुंबातील पुरुषांना दहशतवाद्यांनी त्यांचा धर्म विचारून मग आपल्या नातेवाईकांसमोरच गोळ्या घातल्या. कोणाच्या बायकोसमोर तर कोणाच्या मुलांसमोरच या पर्यटकांना गोळ्या घालण्यात आल्या, त्यामुळे देशभरात या हल्ल्याविरोधात तीव्र संताप आहे. सगळ्यांच्याच मनात या हल्ल्याविरोधातील आग धगधगते आहे. असे असतानाही अजूनही महाराष्ट्रात यावरून राजकारण होताना दिसते आहे. (terrorists have no time to ask religion congress leader on pahalgam attack)

कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील पहलगाम हल्ल्याबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते आहे. पहलगाम येथे ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला त्या सगळ्यांच्या नातेवाईकांनी धर्म विचारूनच गोळ्या घातल्याचे सांगितले होते. तशा बातम्याही प्रसार माध्यमातून समोर आल्या होत्या. असे असतानाही कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवाद्यांना कुठे धर्म विचारण्याइतपत वेळ असतो, अशी टीका केली आहे. काही लोकांनी असं काहीही घडलं नसल्याचं सांगितल्याचंही ते सांगतात. दहशतवाद्यांची कोणतीही जात किंवा धर्म नसल्याचे सांगत त्यांनी यातील दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा – Pakistanis in Maharashtra : सरकारमध्येच एकवाक्यता नसेल तर कसे चालेल? ठाकरेंचा सवाल

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत देशभरात संताप असतानाच वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, हरयाणासह अनेक राज्यांमधील पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून घेत मग गोळ्या घातल्याच्या बातम्यांवर वडेट्टीवार म्हणाले की, हे चुकीचे वृत्त आहे. दहशतवाद्यांकडे एवढा वेळ असतो का, की ते कोणाच्या कानात जाऊन धर्म विचारतील आणि गोळ्या घालतील. काही लोकांच्या मते असं झालेलं नाही. दहशतवाद्यांचा कोणताही धर्म किंवा जात नसते. या प्रकरणातील दोषींना तात्काळ शिक्षा व्हायला हवी, ही जनभावना आहे. याशिवाय या प्रकरणाला कोणाताही वेगळा रंग देण्यात येऊ नये, असेही ते म्हणाले.

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी सरकारने घ्यायला हवी. तिथे सुरक्षा का नव्हती, अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे. 200 किमी.पर्यंत दहशतवादी येतातच कसे, हे तुमच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश नाही का? हे तुमचे अपयश असल्याचे मान्य करायचं सोडून तुम्ही दुसऱ्याच गोष्टींना प्राधान्य देताय. म्हणूनच, दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारल्याला तुमच्या दृष्टीने महत्त्व आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले. दहशतवाद्यांविरोधात कारवाई व्हायला हवी, त्यावर विचार व्हायला हवा. पण सध्या दुसऱ्या गोष्टींचाच विचार सुरू आहे.



Source link

Comments are closed.