टेस्लाची विनाड्रायव्हर रोबोटॅक्सी लाँच

अमेरिकन उद्योगपती इलॉन मस्क यांची कंपनी टेस्लाची विनाचालक रोबोटॅक्सी अखेर लाँच करण्यात आली. टेस्लाने या कारला अमेरिकेच्या ऑस्टिनच्या रस्त्यावर उतरवले आहे. इलेक्ट्रिक कार बनवणाऱया टेस्लासाठी ही एका नव्या युगाची सुरुवात आहे. कंपनीने रविवारी आपल्या विनाड्रायव्हरची टॅक्सी सर्व्हिस सुरू केली आहे. अवघ्या 364 रुपयांत करता येणार राइड करता येणार आहे. सुरुवातीला 20 गाडय़ा चालवल्या जातील. त्यानंतर काही शहरांत ही सर्व्हिस सुरू केली जाणार आहे. टेस्लाने आपल्या या खास सर्व्हिससाठी मोजक्या लोकांना निवडले आहे. हे लोक टॅक्सीत बसून प्रवास करतील, त्यानंतर आपली मते कळवतील. सर्वसामान्य नागरिकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे. मस्क यांना ऑटोनोमस, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स आणि ह्युमनॉइड रोबोटवर खूप विश्वास आहे. टेस्लाने सध्या टेक्सासची राजधानी ऑस्टिनमध्ये याची चाचणी घ्यायला सुरुवात केली आहे. मस्क यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Comments are closed.