टेस्लाचा दरवाजा उघडेना खिडकी फोडावी लागली, अमेरिकेत एनएचटीएसएकडून 1.74 लाख वाय मॉडल कारची तपासणी सुरू

टेस्लाची इलेक्ट्रिक कार जगभरात प्रसिद्ध आहे. या कारचा वेग आणि फीचर्स भन्नाट आहेत, परंतु अमेरिकेत दुर्दैवी घटना समोर आली आहे. टेस्लाच्या वाय मॉडलच्या कारचा दरवाजा कमांड देऊनही उघडला नाही. एका कारमध्ये छोटे मूल अडकले होते. ते बाहेर काढण्यासाठी दरवाजा न उघडल्यामुळे कारची खिडकी फोडून मुलाला बाहेर काढावे लागले. त्यामुळे या कारच्या सुरक्षेवर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी अमेरिकेची परिवहन सुरक्षा एजन्सी नॅशनल हायवे ट्रफिक सेफ्टी ऍडमिनिस्ट्रेशनने 2021 मध्ये बनवलेल्या 1.74 लाख टेस्ला मॉडेल वाय कारची तपासणी सुरू केली आहे.
नॅशनल हायवे ट्रफिक सेफ्टी ऍडमिनिस्ट्रेशनला मिळालेल्या तक्रारीनुसार, आई-वडिलांनी मुलाला कारच्या मागच्या सीटवर बसवले होते. मुलाला बाहेर काढायचे होते, परंतु कारचा दरवाजा उघडला नाही. कारला अनेक कमांड देऊनही कारचा दरवाजा न उघडल्याने अखेर कारची काच फोडावी लागेल. त्यानंतर मुलाला कारमधून काढावे लागले. अशा एक-दोन नव्हे, तर 9 घटना घडल्या आहेत. यातील चार पालकांना आपल्या कारच्या खिडकीची काच फोडावी लागली. इलेक्ट्रिक कारचा दरवाजा लॉक बॅटरीने होतो. अनेकदा कार मालकांना लो व्होल्टेज बॅटरी बदलावी लागली. खरं म्हणजे बॅटरी खराब झाल्याचा कोणताही अलर्ट मिळाला नाही. टेस्लाने कारला मॅन्युअल डोर रीलीज दिला आहे, परंतु याचा वापर छोटे मूल करू शकत नाही. यामुळे या कारच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Comments are closed.