5 वादळी गोलंदाज, ज्यांनी आख्ख्या कारकीर्दीत एकही सिक्सर मारु दिला नाही, भारतीय किती?

Test Cricket Records : सध्याच्या घडीला फलंदाज टी 20 आणि वनडे क्रिकेट प्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये देखील चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसतात. काही खेळाडू असेही आहेत, जे टेस्ट क्रिकेटमध्ये टी 20 क्रिकेटसारखं खेळतात. शिवाय वीरेंद्र सेहवाग सारखे खेळाडू देखील झाले, जे शतक पूर्ण करण्यासाठी एक-दोन रन्स धावून काढत नाहीत, तर षटकार लगावत शतक पूर्ण करतात. कसोटी क्रिकेटमध्ये षटकारांचा पाऊस पाडणे आता कॉमन झाले आहे. मात्र, एक काळ असाही होता, ज्यावेळी फलंदाजांना गोलंदाजांची भीती वाटायची. अशा गोलंदाजांसमोर षटकार मारण्याची हिंमत देखील व्हायची नाही. मात्र, तरी देखील कसोटी क्रिकेटमध्ये कधीना कधी षटकार बसतोच. दरम्यान, असेही काही गोलंदाज होऊन गेलेत, ज्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये मोठी कारकीर्द राहिली आहे. मात्र, तरी देखील त्यांनी एकही सिक्सर मारु दिलेला नाही. आपण अशा गोलंदाजांविषयी जाणून घेऊयात, ज्यांनी 5000 हजार चेंडू टाकून देखील एकदाही षटकार मारु दिलेला नाही.

डेरेक प्रिंगल (Derek Pringle) : या इंग्लंडच्या गोलंदाजाने 30 कसोटी सामन्यांमध्ये 5287 चेंडू टाकले पण एकही षटकार मारु दिला नाही. प्रिंगलने कसोटी क्रिकेटमध्ये 35.70 च्या सरासरीने विकेट्स पटकावल्या आहेत.

किथ मिलर (Keith Miller): या महान ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूने 1946 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 55 कसोटी सामन्यात 22.97 च्या  सरासरीने 170 बळी घेतले. आपल्या कसोटी कारकिर्दीत त्याने 10461 चेंडू टाकले पण एकही षटकार मारु दिला नाही.

नील हॉक (Neil Hawke) : ऑस्ट्रेलियाच्या नील हॉकने 1963 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने 27 कसोटी सामन्यांमध्ये 29.41 च्या  सरासरीने 91 विकेट्स पटकावल्या आहेत.  त्याने 6987 चेंडू टाकले असूनही फलंदाजांना षटकार मारण्यात अपयश आलं.

मुदस्सर नजर (Mudassar Nazar): या पाकिस्तानी खेळाडूने 1976-89 या काळात आपल्या संघासाठी 76 कसोटी सामने खेळले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 5967 चेंडू टाकले आणि 66 विकेट्स घेतल्या पण त्याच्या चेंडूवर एकाही फलंदाजाला  षटकार मारता आला नाही.

महमूद हुसेन (Mahmood Hussain): महमूद हुसेन हा पाकिस्तानी खेळाडू होता ज्याने 1952 मध्ये भारताविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. या खेळाडूने 27 कसोटी सामन्यांमध्ये 38.84 च्या सरासरीने 68 विकेट घेतल्या. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 5910 चेंडू टाकले पण एकाही फलंदाजाला त्याच्याविरुद्ध षटकार मारता आला नाही.

येथे प्रकाशितः 19 मार्च 2025 05:06 पंतप्रधान (आयएसटी)

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..

Comments are closed.