बँकिंग क्षेत्रासाठी कसोटीचा काळ, विद्याधर अनास्कर यांचे मत
रेपो रेट वाढीमुळे बँकिंग क्षेत्रासाठी आगामी काळ कसोटीचा ठरणार असून बँकांना कर्जवाढीबरोबरच चांगल्या कर्जवाटपाकडे लक्ष द्यावे लागेल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. ‘व्याजदर वाढीमुळे कर्ज परतफेडीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. बँकांना नवीन कर्जाकरिता वाढीव कालमर्यादा देण्याबरोबरच सध्याच्या कर्जाची पुनर्रचना करावी लागेल. हे करताना अनुत्पादक कर्जांची तरतूद करावी लागणार असल्याने नफ्याचा वापर करावा लागेल. त्यामुळे बँकांना चांगले कर्ज वितरण, कडक वसुली धोरण, खर्चात बचत, ठेवींवरील व्याजदरात माफक वाढ इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल, असे अनास्कर म्हणाले.
Comments are closed.