Thackeray criticizes BJP over Maharashtra politics
भारतीय जनता पक्षाशी विशेष सख्य असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांवर अचानक संशय व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांची भूमिका होती, आता फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी महाराष्ट्राच्या एकंदरीत निकालांवर राज यांनी आक्षेप घेतला आहे.
(Thackeray Vs BJP) मुंबई : भाजपाने महाराष्ट्राचे राजकारण घाणेरड्या पातळीवर नेऊन ठेवले. माणसे फोडणे आणि आपल्या दावणीला बांधणे हे त्यांचे मुख्य ध्येय झाले आहे. मतविभागणी करून ठिकठिकाणी विजयी होणे हे त्यांचे डावपेच असतात. मराठी माणसांची मते विभागण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच दलितांची मते तोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा बेमालूम वापर केला जातो. या दोघांच्या मदतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आपला डाव महाराष्ट्रात साधून घेतात. हे काही लपून राहिलेले नाही, असा हल्लाबोल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (Thackeray criticizes BJP over Maharashtra politics)
भारतीय जनता पक्षाशी विशेष सख्य असलेले मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या निवडणूक निकालांवर अचानक संशय व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी त्यांची भूमिका होती, आता फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी महाराष्ट्राच्या एकंदरीत निकालांवर राज यांनी आक्षेप घेतला आहे. फडणवीस आणि त्यांचे लोक हे ‘ईव्हीएम’ घोटाळा करूनच सत्तेवर आले आहेत तसेच ते सर्वस्वी बेकायदेशीर असल्याचे राज ठाकरे सांगत आहेत, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा – Nana Patole : मुंडेच नव्हे तर मंत्रिमंडळातील 65 टक्के मंत्र्यांवर गुन्हे, नाना पटोलेंचा दावा
आश्चर्य असे की, वंचितचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर हेदेखील निवडणूक निकालांनंतर ‘ईव्हीएम’वर तुटून पडले आणि आता बरेच दिवस विचार केल्यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही ‘ईव्हीएम’ निकाल खरा नसल्याचे जाहीर केले. लोकांनी मते दिली ती आपल्यापर्यंत पोहोचलीच नाहीत. म्हणजे ईव्हीएमवर ज्यांच्या चिन्हापुढे मतदारांनी बटण दाबले, त्यांच्यापर्यंत मते गेली नाहीत. मग या अदृश्य झालेल्या मतांचे नक्की काय झाले? हा महाराष्ट्राला पडलेला गहन प्रश्न असल्याचे ठाकरे यांनी नमूद केले आहे.
राज ठाकरे यांच्या मनात ही अशी शंका घुसळत असेल तर त्यांनी सर्वात आधी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामाच मागायला हवा. अदृश्य झालेल्या मतांची हेराफेरी करून महाराष्ट्रात भाजपा तसेच त्यांचे लोक सत्तेवर आले आहेत. त्या सगळ्याचे सूत्रधार फडणवीस हेच आहेत, असा आरोप त्यांनी केला. (Thackeray Vs BJP: Thackeray criticizes BJP over Maharashtra politics)
हेही वाचा – Five Day Banking Week : बँकेचा पाच दिवसांचा आठवडा? बजेटमध्ये घोषणा होण्याची शक्यता
Comments are closed.