Thackeray group accuses Modi government of alleged EVM scam msj


केंद्रीय कायदा मंत्रालयाने निवडणूक संचालन नियम 1961च्या नियम 93 (2) (ए) मध्ये घाईघाईत बदल करून निवडणूक आयोगाचे दरवाजे लोकशाहीवादी नागरिकांसाठी बंद केले. निवडणुकीसंदर्भातील कोणताही दस्तावेज आता नागरिकांना उपलब्ध होणार नाही.

(SS UBT about EVM) मुंबई : महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत लोक ‘ईव्हीएम’विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. यासंदर्भात काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टाने निवडणूक आयोगाकडे ‘रेकॉर्ड’ मागताच आयोगाचे धाबे दणाणले आणि ‘ईव्हीएम’ घोटाळा उघड होऊ नये म्हणून सरकारने नियमातच बदल करून टाकला. भारताचा कोणताही नागरिक माहितीच्या अधिकारातही इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मागू शकत नसल्याचे फर्मान आता मोदी-शहा यांच्या सरकारने जारी केले आणि आपण घाबरलो आहोत तसेच ईव्हीएम घोटाळा करूनच आपण निवडणुका जिंकल्या आहेत यावर स्वतःच शिक्कामोर्तब केले, असा थेट आरोप ठाकरे गटाने केला आहे. (Thackeray group accuses Modi government of alleged EVM scam)

ईव्हीएम संपूर्ण जगातून हद्दपार झाले. ईव्हीएमचे दुकान फक्त भारतातच सुरू ठेवले गेले आहे. कारण ‘ईव्हीएम है तो मोदी-शहा है।’ ईव्हीएम नसेल तर भाजपाचा आकडा दीडशे पारही होणार नाही. त्यामुळे जगाने नाकारलेली ईव्हीएम पद्धती भाजपाने भारतात सुरू ठेवली आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाद्वारे केली आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Bhujbal vs Ajit Pawar : अजित पवारांनी फसवणूक केली का? छगन भुजबळ म्हणाले…

केंद्रीय कायदा मंत्रालयाने निवडणूक संचालन नियम 1961च्या नियम 93 (2) (ए) मध्ये घाईघाईत बदल करून निवडणूक आयोगाचे दरवाजे लोकशाहीवादी नागरिकांसाठी बंद केले. निवडणुकीसंदर्भातील कोणताही दस्तावेज आता नागरिकांना उपलब्ध होणार नाही. म्हणजे मोदी-शहा कंपूने निवडणूक आयोगाच्या मदतीने केलेली हेराफेरी उघड होणार नाही, असा दावा ठाकरे गटाने केला आहे.

– Advertisement –

ईव्हीएमचा घोटाळा उघडा करू शकेल असा ‘Rule 93 (2) (a) of the 1961 Conduct of Election Rules’ हा नियमच आता मोडून-तोडून बदलून टाकला. या नियमानुसार ‘‘All other papers relating to the election shall be open to the public inspection’’ हा नियम होता, त्या नियमाचा खून करून आता ‘‘not all poll-related papers can be inspected by the public. Only those papers specified in the conduct of election Rules can be inspected by the public’’ असा बदल करून ‘ईव्हीएम’ निवडणुकीतला घोटाळा लपविण्याचा प्रयत्न मोदी-शहा यांनी केला आहे. याचाच अर्थ महाराष्ट्राच्या विधानसभा निकालात तसेच हरयाणा, ओडिशा, बिहारच्या लोकसभा निकालात घोटाळा करून हे लोक सत्तेवर आले आहेत, असा आरोपही ठाकरे गटाने केला आहे. (SS UBT about EVM: Thackeray group accuses Modi government of alleged EVM scam)

हेही वाचा – Chhagan Bhujbal : बॅनरवर फोटो नसला तरी…; त्या प्रकरणावर काय म्हणाले छगन भुजबळ?


Edited by Manoj S. Joshi



Source link

Comments are closed.