Thackeray Group Criticizes Election Commission Regarding ’17 A’ msj
महाराष्ट्र आणि झारखंडमधील पराभूत उमेदवार ‘ईव्हीएम’ घोटाळ्यातील ‘17 A’ फॉर्मवर काम करीत आहेत हे लक्षात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या महामंडळाचे धाबे दणाणले.
(SS UBT Vs EC) मुंबई : महाराष्ट्रात धक्कादायक निकाल लागल्यानंतर अनेक उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे ‘17 A’ची मागणी केली, पण उडवाउडवीची उत्तरे मिळाली. निवडणूक अधिकाऱ्यांना लपवाछपवी करण्याचे काहीच कारण नव्हते. बुथवर झालेले मतदान व प्रत्यक्ष ईव्हीएममधील आकडे जुळतात का, एवढेच पाहायचे आहे व त्यासाठी ‘17 A’ची मागणी करणे गैर काय? असा प्रश्न करत ठाकरे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे. (Thackeray Group Criticizes Election Commission Regarding ’17 A’)
‘ईव्हीएम’ निवडणुकीत ‘Form 17 A’ हा महत्त्वाचा भाग आहे. मतदार यादी आणि प्रत्यक्ष झालेले मतदान याचा मेळ होतो का, हे पाहणे आवश्यक ठरते. महाराष्ट्रात जे धक्कादायक निकाल लागले, तेव्हा अनेक उमेदवारांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे ‘17 A’ची मागणी केली आणि प्रत्यक्ष ईव्हीएममधून बाहेर पडलेल्या मतदानाच्या मोजणीची मागणी केली. ही मागणी करताच अनेक ठिकाणी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तर, ही कागदपत्रे देण्यास नकारही देण्यात आला आणि शेवटी ‘ही कागदपत्रे’ तुम्हाला 45 दिवसांनंतर मिळतील, असे सांगितले गेले. ही सरळ सरळ लफडेगिरी आहे, असा हल्लाबोल ठाकरे गटाने केला आहे.
– Advertisement –
हेही वाचा – SS UBT about EVM : ईव्हीएम घोटाळ्यावर मोदी सरकारकडूनच शिक्कामोर्तब, ठाकरे गटाचा थेट आरोप
न्यायालयाने 45 दिवसांची मुदत याचिका करण्यासाठी दिली आहे. ही कागदपत्रे म्हणजे ईव्हीएम घोटाळय़ाचा पुरावा ठरतो, पण ती कागदपत्रेच मिळणार नसतील तर निवडणूक याचिकेला अर्थ नाही आणि न्यायालय याचिका पहिल्या सुनावणीतच फेटाळून लावेल, याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखातून लक्ष वेधले आहे.
– Advertisement –
महाराष्ट्र आणि झारखंडमधील पराभूत उमेदवार ‘ईव्हीएम’ घोटाळ्यातील ‘17 A’ फॉर्मवर काम करीत आहेत हे लक्षात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यांच्या महामंडळाचे धाबे दणाणले. ‘17 A’ शोधणारे आपल्या घोटाळ्याची नाडी ओढणार या भीतीने धावाधाव सुरू झाली. ‘17 A’चे हत्यार सामान्य जनतेने वापरायला सुरुवात केली तर निवडणूक घोटाळा करून जिंकलो आणि सत्तेवर आलो, हे तर उघड होईलच, परंतु कितीही निर्लज्ज झालो तरी जगात लोकशाहीचे लफंगे म्हणूनच फिरावे लागेल या भीतीने त्यांचे पाय लटपटू लागले, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे. (SS UBT Vs EC : Thackeray Group Criticizes Election Commission Regarding ’17 A’)
हेही वाचा – Divorce case : मुलीकडच्या मंड ळींनी सासरी तळ ठोकून बसणे क्रूरताच, कलकत्ता हायकोर्टचे निरीक्षण
Comments are closed.