Thackeray group targeting Modi msj
मोदी आणि त्यांचे लोक मनमोहन सिंग तसेच पंडित नेहरूंवर टीका करताना पातळी सोडून बोलत राहिले. सारी दुनिया ज्यांचा सन्मान करते अशा मनमोहन सिंग यांना मोदी आणि त्यांच्या लोकांनी ‘मौनीबाबा’ म्हणून हिणवले, पण मनमोहन सिंग यांनी भारताच्या तसेच जगभरातील मीडियाशी सदैव संवाद ठेवला.
(Dr Manmohan Singh) मुंबई : राष्ट्रनिर्माणाचे महानायक डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारताच्या राजकारणातले सुसंस्कृत आणि इमानदारीचे अखेरचे पान गळून पडले आहे. 2004मध्ये डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर भारताची अर्थव्यवस्था तिप्पट झाली. परदेशी गुंतवणुकीचा प्रवाह वाढला. त्यावेळी त्यांनी विविध योजना आणल्या. हे सर्व मनमोहन सिंग यांनी संयमाने व तोंड बंद ठेवून केले. आकांडतांडव न करता, खोटे न बोलता, जुमलेबाजी न करताही देशाचे नेतृत्व करता येते हे डॉ. मनमोहन सिंग यांनी दाखवून दिले, असे सांगत ठाकरे गटाने पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान केले आहे. (Thackeray group targeting Modi)
गेल्या दहा वर्षांपासून मनमोहन सिंग हे सत्तेवर किंवा राजकारणात सक्रिय नव्हते, पण जेव्हा जेव्हा इमानदारी व सत्य-सचोटीचा विषय निघे तिथे डॉ. सिंग यांचे नाव आदराने घेतले जात असे. मनमोहन सिंग यांनी 20 वर्षांपूर्वी पंतप्रधानपदाची शपथ घेताच नवभारताच्या पुनर्निर्माणास प्रारंभ झाला. आधी नरसिंह राव यांनी डॉ. सिंग यांना अर्थमंत्रीपदाची जबाबदारी दिली तेव्हा अनेकांनी नाके मुरडली होती. देशाच्या तिजोरीत तेव्हा खडखडाट होता. 16 दिवस पुरतील इतकेच पैसे होते. अर्थमंत्रीपद स्वीकारणे हा तेव्हा आतबट्ट्याचा व्यवहार होता. नरसिंह रावांनी भारताची अर्थव्यवस्था राजकीय व्यक्तीच्या हाती न सोपवता एका निष्णात डॉक्टरच्या हाती सोपवून देशावर उपकार केले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटले आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Dr. Manmohan Singh : डॉ. मनमोहन सिंग नेहमीच घालायचे निळ्या रंगाची पगडी, कारण…
डॉ. मनमोहन सिंग यांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्राला समर्पित होते. भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान मोदी हे 80-85 कोटी लोकांना माणशी 30 किलो धान्य फुकट देण्याचा डंका प्रचार सभांतून पिटतात. ही मूळ योजना डॉ. मनमोहन सिंग यांनीच आणली. 2013 मध्ये राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायदा आणून प्रत्येकाला जगण्याचा आणि पोटभर जेवणाचा अधिकार दिला. 2005 मध्ये मनमोहन सिंग यांनी माहितीचा अधिकार जनतेला दिला. त्या अधिकारावर हल्ले करण्याचे काम आता सुरू आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.
– Advertisement –
नोटाबंदीसारखे दळभद्री प्रकार मोदी काळात झाले. तेव्हा अर्थशास्त्री डॉ. मनमोहन सिंग यांनी संसदेत फक्त सात मिनिटांचे भाषण केले व सांगितले की, ‘नोटाबंदीमुळे देशाचा ‘जीडीपी’ दोन टक्क्यांनी घसरेल. नोटाबंदी ही एक सुसंघटित लूट आहे. गैरव्यवस्थापनाचे स्मारक यानिमित्ताने बांधले गेले आहे.’ पुढच्या चार महिन्यांत देशाने अनुभवले की, जीडीपी 2.1 टक्क्यांनी घसरला. देशाची सामुदायिक लूट सुरू झाली व अर्थव्यवस्था कोसळली. नोकरदार वर्ग आणि लहान व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले, याकडे ठाकरे गटाने लक्ष वेधले आहे.
मोदी यांच्या काळात रुपयाचे पूर्ण अवमूल्यन झाले, पण मोदी आणि त्यांचे लोक मनमोहन सिंग तसेच पंडित नेहरूंवर टीका करताना पातळी सोडून बोलत राहिले. सारी दुनिया ज्यांचा सन्मान करते अशा मनमोहन सिंग यांना मोदी आणि त्यांच्या लोकांनी ‘मौनीबाबा’ म्हणून हिणवले, पण मनमोहन सिंग यांनी भारताच्या तसेच जगभरातील मीडियाशी सदैव संवाद ठेवला. पंतप्रधानपदाच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीत देश आणि विदेशात त्यांनी सव्वाशे पत्रकार परिषदा घेतल्या. त्यातील 72 पत्रपरिषदा त्यांनी विदेश दौऱ्यात घेतल्या. ‘‘पत्रकारांशी बोलताना मला संकोच वाटत नाही व भीतीही वाटत नाही,’’ असे डॉ. सिंग नेहमी सांगत. पत्रकारांचा कोणताही प्रश्न ते टोलवत नसत हे महत्त्वाचे, अशा शब्दांत ठाकरे गटाने मोदी यांना लक्ष्य केले आहे. (Dr Manmohan Singh: Thackeray group targeting Modi)
हेही वाचा – Dr. Manmohan Singh : यूपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करणारे अण्णा हजारे म्हणतात…
Comments are closed.