Thackeray group targets Akshay Kumar, Juhi Chawla, Anupam Kher msj
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका डॉलरची किंमत एक रुपया इतकी होती. आज एक डॉलर घेण्यासाठी साधारण 87 रुपये द्यावे लागतात. याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि देशात आर्थिक अराजक माजले आहे.
(Depreciation of Rupee) मुंबई : सत्तेवर नसताना नरेंद्र मोदी यांना रुपयाच्या घसरणीची चिंता वाटत होती तेव्हा रुपया जागतिक बाजारात डॉलरच्या तुलनेत ‘60’ होता आणि आज मोदी काळात ‘87’ इतका घसरला. म्हणजे काँग्रेसच्या तुलनेत मोदी काळात भारताची प्रतिष्ठा आणि रुपया सर्वाधिक पडला आहे. तरीही मोदी हे विश्वगुरू असल्याचा डंका त्यांचे भक्त पिटत आहेत. मोदी यांचे अंधभक्त सर्वच क्षेत्रांत आहेत. अक्षय कुमार, अनुपम खेर, जुही चावला या सिने कलावंतांचाही त्यात समावेश आहे, अशी खरपूस टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group targets Akshay Kumar, Juhi Chawla, Anupam Kher)
देशात काँग्रेसचे राज्य असताना गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना रुपयाचे अवमूल्यन पाहवत नव्हते. डॉलर्सच्या तुलनेत रुपयाची घसरण पाहून त्यांच्यातला राष्ट्रवाद उसळ्या मारीत होता. ‘‘जसजसा रुपया घसरतोय तसतशी भारताची प्रतिष्ठाही घसरत असते, पण भारताच्या प्रतिष्ठेची काँग्रेसला चिंता नाही,’’ असे मोदी म्हणत होते, याचे स्मरण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून करून दिले आहे.
– Advertisement –
हेही वाचा – Devendra Fadnavis : 10 हजार नवउद्योजक तयार करण्याचे उद्दिष्ट; मुख्यमंत्र्यांची माहिती
सन 2013मध्ये 1 डॉलर 60 रुपये इतका होता आणि रुपयाची ही घसरण पाहून जुही चावला बेजार झाली होती. तेव्हा रुपयाच्या चिंतेने जुही चावलाने एक जोरदार ट्वीट केले होते. ‘‘देवाची कृपा आहे, आपल्या अंडरवेअरचे (म्हणजे चड्डीचे) नाव ‘डॉलर’ आहे. चड्डीचे नाव ‘रुपया’ असते तर सारखी खाली पडत राहिली असती.’’ आज एका डॉलरचा भाव 86.60 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. हा सगळ्यात नीचांक आहे. जुही चावला आता कोठे आहे? सिनेमावाल्यांच्या ‘चड्ड्या’ आता खाली पडत नाहीत काय? असा प्रश्न ठाकरे गटाने केला आहे.
– Advertisement –
दुसऱ्या एका ‘ट्विट’मध्ये जुही चावलाने ‘रुपयाला स्वतःला वाचविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे डॉलरला राखी बांधणे,’ असा टोला हाणला होता. मग आता सर्वात नीचांकी गेलेल्या रुपयाला वाचविण्यासाठी जुही चावला डॉलरला संक्रांतीच्या पतंगाचा मांजा बांधायला सांगणार आहे का? अशी बोचरी टीकाही या अग्रलेखात करण्यात आली आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका डॉलरची किंमत एक रुपया इतकी होती. आज एक डॉलर घेण्यासाठी साधारण 87 रुपये द्यावे लागतात. याचा अर्थ भारताची अर्थव्यवस्था कोलमडली आहे आणि देशात आर्थिक अराजक माजले आहे. देशावर कर्जाचा डोंगर वाढतो आणि तिजोरीचा रिकामा डबा होतो तेव्हा रुपयाची घसरण जागतिक बाजारात सुरू होते, हे साधे अर्थशास्त्र आहे. रुपया अस्थिर आहे याचा सरळ अर्थ भारतात विकासाची गती मंदावली आहे आणि सरकार विकासकामे करण्यात कमी पडले आहे, असे ठाकरे गटाने सुनावले आहे. (Depreciation of Rupee: Thackeray group targets Akshay Kumar, Juhi Chawla, Anupam Kher)
हेही वाचा – Delhi Election 2025 : जमत नसेल तर मोडून टाका इंडि आघाडी…आप-कॉंग्रेसमध्ये खटके, अब्दुल्ला भडकले
Comments are closed.