Thackeray group targets Congress over differences in ‘INDIA’ alliance msj
इंडि आघाडीत लोकसभेआधी चांगले वातावरण नक्कीच होते. पाटणा, बंगळुरू, दिल्ली, मुंबईसारख्या ठिकाणी जंगी बैठका झाल्या. अनेक घटक पक्षांनी आपापल्या राज्यात इंडि आघाडीच्या बैठकांचे यजमानपद स्वीकारले.
(Shiv Sena UBT) मुंबई : देशासमोर प्रश्नांचा डोंगर उभा राहिला आहे. जनता त्रस्त आहे. तरीही मोदी यांचा भाजपा विजयी होतो. हा विजय खरा नाही असे जनता सांगते. हे सर्व घडत असताना इंडि आघाडी नेमकी काय करत आहे? पावसाळ्यात निर्माण झालेले गांडूळ किंवा बेडूक हे पावसाळा संपताच नष्ट होतात. निवडणुकीसाठी निर्माण झालेल्या ‘इंडिया’सारख्या आघाड्यांचे जीवन अल्प न ठरता ते सदैव राष्ट्रकार्यासाठी समर्पित असावे या मताचे आम्ही आहोत, असे सांगत ठाकरे गटाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. (Thackeray group targets Congress over differences in ‘INDIA’ alliance)
इंडि आघाडीत लोकसभेआधी चांगले वातावरण नक्कीच होते. पाटणा, बंगळुरू, दिल्ली, मुंबईसारख्या ठिकाणी जंगी बैठका झाल्या. अनेक घटक पक्षांनी आपापल्या राज्यात इंडि आघाडीच्या बैठकांचे यजमानपद स्वीकारले. सर्व मस्तच चालले होते. लोकसभा निवडणुकीत उत्तम निकाल घेतल्यावर नंतर मात्र संवादाच्या नावाने ठणाणा अशी स्थिती निर्माण झाल्याचे मत घटक पक्ष व्यक्त करीत आहेत. डी. राजा यांच्यासारख्या ज्येष्ठ डाव्या नेत्यानेही आता हीच वेदना व्यक्त केली. या वेदनेची दखल शेवटी काँगेसलाच घ्यावी लागेल.
– Advertisement –
हेही वाचा – Thackeray about INDIA : काँग्रेस हेच समजून घ्यायला तयार नाही, ठाकरे गटाने सुनावले
पहिल्या इंडि आघाडीच्या बैठकीचे यजमानपद जनता दल युनायटेड नितीश कुमार यांनी पाटण्यात स्वीकारले. त्या पहिल्याच बैठकीत नितीशबाबूंनी भाजपाची विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाहीविरुद्ध एकजुटीने लढण्याचा मंत्र दिला, पण इंडि आघाडीचा हा मजबूत शिलेदारच मोदी यांना सामील झाला.
– Advertisement –
आता देशात इंडि आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हे एक त्रांगडेच झाले आहे, अशी भावना लोकांत निर्माण झाली असेल तर त्यास जबाबदार कोण? या दोन्ही आघाड्या निर्माण झाल्या आणि कामास लागल्या तेव्हा आघाडीतील प्रत्येक घटक पक्षात तसेच एकंदरीत जनमानसात उत्साह निर्माण झाला. देशावर लादलेला मनमानी कारभार, भ्रष्टाचार याविरुद्ध लढणारी एक शक्ती निर्माण झाल्याचा आत्मविश्वास भारतीयांत संचारला होता, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. (Shiv Sena UBT: Thackeray group targets Congress over differences in ‘INDIA’ alliance)
हेही वाचा – Thackeray about Omar Abdullah : ज्युनियर अब्दुल्लांचे सूर बदलले, ठाकरे गटाचा घणाघात
Comments are closed.