Thackeray group’s criticism of Modi-Shah regarding Maharashtra Assembly result msj


निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या तक्रारीवर 60 पानांचे उत्तर दिले आणि 76 लाख मतदान वाढले ते बरोबर असल्याचे सांगितले. मग त्याबाबतचे पुरावे आणि मतदान केंद्रावरील फुटेज का नाकारले जात आहे? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

(SS UBT on ECI) मुंबई : ज्याची लाठी त्याचीच म्हैस अशा पद्धतीची आपली लोकशाही आहे. भारताचा निवडणूक आयोग ही काठी असून, ही काठी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती असल्याने लोकशाहीची म्हैसही त्यांचीच आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. (Thackeray group’s criticism of Modi-Shah regarding Maharashtra Assembly result)

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत अखेरच्या टप्प्यात 76 लाख मते वाढली. शेवटच्या तासा-दीड तासात आणि खासकरून मतदानाची वेळ संपता संपता 76 लाख मते वाढतात, मतदानाची टक्केवारी वाढते तसेच या अचानक वाढलेल्या टक्केवारीवर भाजपा आणि त्यांचे दोन बगलबच्चे सव्वा दोनशे जागा जिंकून महाराष्ट्रात सरकार बनवतात, हे रहस्य काय? अशी विचारणा महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली, पण निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या शंका फेटाळून लावल्या आणि तासाभरात 76 लाख म्हणजे ‘पाऊण कोटी’ मते वाढणे सहज शक्य असल्याचा निकाल देऊन टाकला, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

– Advertisement –

हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : जमिनीची मालकी देणाऱ्या स्वामित्व योजनेचा 27 डिसेंबरला शुभारंभ; महसूल मंत्री बावनकुळे यांची घोषणा

हे मतदान शेवटच्या तासा-दीड तासात कसे वाढले याचा कोणताही तर्कशुद्ध खुलासा निवडणूक आयोग करू शकला नाही. तासाभरात ‘पाऊण कोटी’ मतदान कसे वाढले आणि त्यातही भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष जिंकलेल्या जागांवर सरासरी 25 ते 30 हजार इतके मतदान अचानक कसे काय वाढले? हे प्रश्न अगदी स्वाभाविक आहेत आणि सामान्य मतदारांनादेखील ते पडले असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रेलखाच्या माध्यमातून म्हटले आहे.

– Advertisement –

महाराष्ट्रात शेवटच्या तासाभरात ‘पाऊण कोटी’ मतदान वाढले हाच कळीचा मुद्दा आहे आणि निवडणूक आयोग इतकेच सांगते की, ‘‘हे होऊ शकते.’’ हे 76 लाख मतदार जमिनीतून बाहेर आले की हवेतून खाली पडले? मग मतदान केंद्रावरील सीसी टीव्ही फुटेज समोर का आणले जात नाही? हा सरळ मुद्दा आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या तक्रारीवर 60 पानांचे उत्तर दिले आणि 76 लाख मतदान वाढले ते बरोबर असल्याचे सांगितले. मग त्याबाबतचे पुरावे आणि मतदान केंद्रावरील फुटेज का नाकारले जात आहे? असा सवाल ठाकरे गटाने केला आहे.

परळीसारख्या मतदान केंद्रावर धनुभाऊचे गुंड लोकांना मतदान केंद्रावर फिरकू देत नव्हते. या झुंडशाहीचे चित्रण झाले. ही दहशत अनेक मतदारसंघांमध्ये झाली. निवडणूक आयोगाने हे सर्व पाहिले नसेल तर त्यांच्या डोळ्यातला मोतीबिंदू वाढला आहे आणि त्यांनी त्यांची बुबुळे साफ करून घेतली पाहिजेत, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे. (SS UBT on ECI : Thackeray group’s criticism of Modi-Shah regarding Maharashtra Assembly result)

हेही वाचा – Supriya Sule : छगन भुजबळांवर मोठा अन्याय; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला


Edited by Manoj S. Joshi



Source link

Comments are closed.