Thackeray targets Modi over Trump’s decision


(Reciprocal Tariffs) मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लादण्याची धमकी अखेर खरी केली आहे. त्यामुळे ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ म्हणजे ‘जशास तसा’ कर लागू झाला आहे. या 25 टक्के आयात शुल्काचा फटका चीन, कॅनडा, मेक्सिको आदी देशांसह भारतालाही बसला आहे. ‘टॅरिफ’चा वरवंटा भारतावरही फिरविण्यात त्यांनी कुठलेही ‘डावे-उजवे’ केले नाही. स्वतःला ट्रम्प यांचे परममित्र वगैरे म्हणवून घेणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी आता काय करणार आहेत? ते काय करतील ते करतील, परंतु ट्रम्प यांच्या निर्णयांनी मोदींच्या चाणक्यनीतीचा आणि ट्रम्प मैत्रीचा फुगा फुटला आहे हे मात्र निश्चित, असा जोरदार टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Thackeray targets Modi over Trump’s decision)

भारताकडे संपूर्ण जग एक विश्वासू भागीदार म्हणून पाहत आहे. त्यामुळे देशातील उद्योग क्षेत्राने या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी केले, परंतु त्यांचेच परममित्र प्रे. ट्रम्प यांनी मात्र मोदी यांच्या या विश्वासालाच तडाखा दिला आहे, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामाना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून म्हटले आहे.

हेही वाचा – Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात केवढे हे क्रौर्य, आपण कोणासाठी विकास करतोय, छगन भुजबळ यांचा उद्विग्न सवाल

ट्रम्प यांच्या दुसऱ्या राजवटीमुळे भारतीय उद्योग आणि अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ येतील, जो बायडेन यांच्यापेक्षा ट्रम्प भारतासाठी ‘उजवे’ आहेत, अशा भाकडकथा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोदीभक्तांनी रंगवून सांगितल्या होत्या. मात्र निवडून आल्यानंतर हेच ट्रम्प एका पाठोपाठ एक हिंदुस्थानविरोधी निर्णय घेत या कथांचा रंग खरडून काढत आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

ट्रम्प हे अमेरिकेचे पुन्हा राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मोदी यांनी लगेचच अमेरिका दौरा केला होता. ट्रम्प यांच्या गळाभेटी घेतल्या होत्या. दोघांनीही ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ करीत आपल्या मैत्रीची ग्वाही दिली होती. भारतातील मोदीभक्तांनीही ट्रम्प यांच्या एककल्ली कारभाराचा फटका मोदी यांच्यामुळे भारताला कसा बसणार नाही, मोदी यांची चाणक्यनीती कशी यशस्वी ठरली वगैरे फुगे हवेत सोडले होते. मात्र मोदी यांचे विमान अमेरिकेतून उडाल्यापासूनच ट्रम्प महाशय मोदीभक्तांनी उडविलेले हे फुगे फोडत आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आयात शुल्क म्हणजे ‘रेसिप्रोकल टॅरिफ’ लागू करण्याचा ट्रम्प यांचा ताजा निर्णय भारतासाठी मोठा धक्का आहे. कारण अमेरिका हा भारताचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. त्यामुळे अमेरिकेच्या या निर्णयाचा भारतीय उद्योगावर व्यापक दुष्परिणाम होणार आहे. प्रामुख्याने आयटी, औषधे, ऑटोमोबाईल यांसह स्टील आणि ऍल्युमिनियम तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रांना ट्रम्प यांच्या या ‘टॅरिफराज’चा जबर तडाखा बसणार आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Nitesh Rane vs Rohit Pawar : महापुरुषांबद्दलच्या आक्षेपार्ह विधानावरून नितेश राणे – रोहित पवार भिडले



Source link

Comments are closed.