थलपती विजयचा चित्रपटसृष्टीला रामराम, राजकारणात पूर्णवेळ सक्रिय होणार

दक्षिणेकडील सुपरस्टार थलपती विजय याने चित्रपटसृष्टीला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे त्याचे फॅन्स निराश झाले आहे. विजयने त्याच्या 10 वर्षी चित्रपट क्षेत्रामध्ये पदार्पण केले होते. तसेच त्याने जवळपास 69 चित्रपट केले आहेत. हा सुपरस्टार आता चित्रपटसृष्टीला निरोप देत आहे. त्याचा शेवटचा चित्रपट येत्या 9 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

दक्षिणेचा सुपरस्टार थलपती विजयने नेहमीच त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने मने जिंकली आहेत. तो अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. थलपती विजयचा शेवटचा चित्रपट, “जाना नायगन”या चित्रपटासाठी त्याचे चाहते आता खूपच भावूक झाले आहेत. त्यांचा आवडता स्टार शेवटच्या वेळी मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. अलीकडेच, चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमात, विजय भावनिक होताना दिसला, त्याच्या डोळ्यात अश्रू होते. चित्रपटांनंतर, विजय आता पूर्णपणे राजकारणावर लक्ष केंद्रित करण्यास सज्ज झाला आहे.

विजयसोबत “जाना नायगन” मध्ये बॉबी देओल, पूजा हेगडे, ममिता बैजू, गौतम वासुदेव मेनन, प्रकाश राज, नारायण आणि प्रियामणी मुख्य भूमिकांमध्ये आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन एच. विनोद यांनी केले आहे.

थलपती विजयने अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले आहे. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटांमध्ये लिओ (615 कोटी), गोट (460 कोटी), बिगिल (304 कोटी), वारिसु (303 कोटी) आणि मेर्सल (257 कोटी) यांचा समावेश आहे. या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळाले होते. फोर्ब्सच्या अहवालानुसार, थलपती विजयची एकूण संपत्ती 474 कोटी आहे. तो अभिनयातून सर्वाधिक कमाई करतो. अहवाल असे दर्शवितात की विजय प्रति चित्रपट 130 ते 200 कोटी घेतो.

Comments are closed.