कॅडबरी सिग्नलवर तिसऱ्या डोळ्या’ची कामगिरी, अडीच महिन्यांत 30 हजार बेशिस्त वाहनचालक सीसीटीव्हीत कैद

गेल्या अडीच महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे ३० हजार ८५ वाहनचालक सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. कॅडबरी सिग्नल वरील ‘तिसऱ्या डोळ्या’ने कामगिरी केली असून नियमाचे पालन न करणाऱ्यांना वाहनचालकांना दंडासह ई-चलान पाठवले आहे. २४ तास कार्यान्वित असलेल्या या हाय-डेफिनेशन कॅमेऱ्याद्वारे सिग्नलवरील वाहतुकीवर करडी नजर ठेवली जात आहे.
ठाण्यात वाहतुकीला शिस्त लावण्याकरिता तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन रोखण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी आयटीएमएस प्रणालीचा अवलंब केला आहे. १ सप्टेंबरपासून ठाण्यातील कॅडबरी जंक्शन सिग्नल वर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मागील अडीच महिन्यांत कॅडबरी सिग्नलवर वाहतूक नियमभंग करणाऱ्या तब्बल ३० हजार ८५ वाहनचालकांना लक्ष्य केले.
३० लाखांचा दंड
सिग्नल तोडणे, १८ हजार १६५ इतकी असून विनाहेल्मेट दुचाकी चालवणारे १० हजार ६११ इतके आहेत. सिग्नल वरील स्टॉप लाइनवर न थांबणाऱ्या ८१५ आणि ट्रिपल सीट वाहने हाकणाऱ्या ४९४ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या दोषी वाहनचालकांवर ३० लाख ८५ हजार इतका दंड आकारण्यात आला आहे.

Comments are closed.