मध्यरात्री पत्नी अन् मुलीला संपवत नवऱ्यानेही उचचले टोकाचे पाऊल; उल्हासनगरमध्ये अख्ख कुटुंब संपल

ठाणे गुन्हे: ठाण्याचा उल्हासनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे .आर्थिक विवंचनेतून आधी पत्नी आणि अल्पवयीन मुलीची हत्या करत पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने उल्हासनगर कॅम्प नं 1 मध्ये मोठी खळबळ उडाली आहे . पवन पहुजा असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे .आर्थिक विवंचनेमुळे त्याने आधी पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी हिला संपवले .नंतर स्वतः आत्महत्या केली . आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये आत्महत्येचं कारण सांगणारा व्हिडिओ करत त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे . एका रात्रीत सगळं कुटुंब संपल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते.

नक्की घडले काय?

गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी उल्हासनगर पोलीस तातडीने दाखल झाले होते .पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत तिघांचेही मृतदेह शबविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात हलविले . पंचनाम्यानंतर तपासात पोलिसांना मोबाईल मध्ये पतीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सापडला .यात वाढलेल्या आर्थिक ताणामुळे पत्नी व मुलीची हत्या करून त्याने आत्महत्या करत असल्याचे कारण सांगितले आहे . पवन हा सोनार गल्ली परिसरात एका दुकानात कामाला होता .गुरुवारी मध्यरात्री त्याने मुलगी व पत्नी यांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली .याप्रकरणी आता उल्हासनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत . (Thane Crime)

उबेर चालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

उबेर चालकाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पवई येथे राहणारी 14 वर्षीय मुलीने मंगळवारी दुपारी 4.30 दरम्यान दादर प्रभादेवी येथून घरी जाण्यासाठी उबेर अॅपवरुन कार बुक केली होती. उबेर चालकाने मुलीने दिलेल्या पवई येथील घराच्या दिशेने कार न घेऊन जाता इस्टन एक्सप्रेसकडे कार निर्जनस्थळी नेल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे. तसेच उबेर चालकाकडून मुलीसोबत गैरवर्तन करत तिची छेड काढल्याचा आरोप तक्रारीत मुलीने केला आहे.

हेही वाचा:

धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, नांदेडमध्ये शिक्षकाचा जागीच मृत्यू; पोलिसांची घटनास्थळी धाव

https://www.youtube.com/watch?v=Hblbrzuaahc

अधिक पाहा..

Comments are closed.