मी इकडचा भाई, माझ्याकडून गरब्याची परवानगी घेतली का? ठाण्यात कार्यक्रमामध्येच शिंदेंच्या शाखाप्र
ठाणे क्राइम न्यूज: नवरात्रोत्सवाच्या (Navratri 2025) आनंदात रंगलेला ठाण्याच्या उल्हासनगर (Ulhasnagar) येथील गरबा कार्यक्रम अचानक दहशतीत बदलला. कॅम्प क्रमांक 2 येथील बंजारा विकास परिषदेच्या परिसरात आयोजित गरब्यादरम्यान, एका सराईत गुन्हेगाराने शिवसेना शाखाप्रमुखावर बंदूक दाखवत हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे सणाच्या आनंदाला मोठा धक्का बसला असून, पोलिसांनी (Police) तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे.
मंगळवारी रात्री कॅम्प क्रमांक 2 येथील 24 नंबर शाळेजवळ बालाजी मित्र मंडळ आणि शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे यांच्या पुढाकाराने गरबा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, साडेअकरा ते पावणे बाराच्या दरम्यान सोहम पवार नावाचा स्थानिक गुन्हेगार कार्यक्रमस्थळी येऊन “मी इकडचा भाई आहे, गरब्याची परवानगी माझ्याकडून घेतली का?” असे दमबाजी करत थेट बाळा भगुरे यांच्यावर बंदूक रोखली. या घटनेने कार्यक्रमस्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हवेत दोन गोळ्या झाडल्या (Thane Crime News)
भगुरे यांच्या भावाने प्रसंगावधान दाखवत मध्यस्थी केली, मात्र सोहमने दहशत निर्माण करण्यासाठी हवेत दोन गोळ्या झाडल्या. यावेळी सोहमचा वडील अनिल पवारही दहशत निर्माण करण्यासाठी सोहमच्या बाजूने उभा असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, बाळा भगुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून आरोपींना अटक (Thane Crime News)
दरम्यान, बुधवारी पोलिसांनी वेगाने कारवाई करत कॅम्प क्रमांक 4 येथून आरोपी सोहम पवार (वय 19) आणि त्याचे वडील अनिल पवार या दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून पिस्तुल जप्त केले आहे. या घटनेमुळे नवरात्रोत्सवाच्या आनंदाला आळा बसला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.