राज्य कॅरम स्पर्धेसाठी उद्या निवड चाचणी

आगामी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी ठाणे जिल्हा ज्युनिअर व युवा गट कॅरम निवड चाचणी रविवारी 5 ऑक्टोबर रोजी ठाण्याच्या सतीश प्रधान ज्ञान साधना कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे. या चाचणीचे उद्घाटन प्राचार्य गणेश भगुरे यांच्या हस्ते होईल.  यात जिह्यातील 18 व 21 वर्षाखालील मुले-मुलींना निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धेच्या माहितीसाठी ठाणे संघटनेचे सचिव जितेंद्र दळवी  (9769380750) यांच्याशी संपर्क साधता येईल.

Comments are closed.