होतकरू, मिडलाईनची आगेकूच
चरई येथील श्री मावळी मंडळाच्या भव्य पटांगणावर रंगलेल्या 73 व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत दुसऱ्या दिवशी पुरुष व महिला गटात चुरशीचे सामने पाहायला मिळाले. पुरुष गटांत होतकरू, मिडलाईन, जय भवानी आणि बालगोपाळ यांनी विजयी आगेकूच कायम ठेवली, तर महिलाच्या गटात स्नेहविकास, ओम् वर्तकनगर आणि नवशक्ती संघांनी छाप पाडली. या स्पर्धेत होतकरू मंडळाने केदारनाथवर 28-19 अशी मात करत उत्तरार्धात जोरदार पुनरागमन केले. मितेश चव्हाणच्या चढाया आणि तुषार यादव-देवेन पाटीलच्या भक्कम बचावाने विजय निश्चित केला. मिडलाईन स्पोर्ट्सने अष्टविनायकवर 31-23 असा विजय मिळवत अभिषेक भोईर, धीरज बैलमारे यांचा प्रभावी खेळ दाखवला. जय भवानीने चिंतामणीवर 34-25 अशी सरशी करत तुळशीदास शिर्के व कुणाल शिंदे चमकले.
Comments are closed.