कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू, पोलिसांवर केला गंभीर आरोप
ठाणे कल्याण बातम्या : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात केली होती. तसेच कल्याणमध्ये बेपत्ता नगरसेवक असे पोस्टरही लावण्यात आले होते. याप्रकरणी रमेश तिखे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्यासाठी कॉल केला होता. त्यामुळं तिखे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलीस ठाण्यात मधुर म्हात्रे यांनी पोस्टर लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला होता. यामुळे पोलीस त्यांना कॉल करत असल्याने तिखे यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली होती
मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी कारवाईसाठी वारंवार फोन करुन कार्यकर्त्यांना घाबरवण्याचा प्रयत्न केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे उपविभाग प्रमुख रमेश तिखे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मधुर म्हात्रे यांचे वडील उमेश म्हात्रे आणि पोलीस या मृत्यूला जबाबदार धरत कारवाईची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक बेपत्ता असल्याची तक्रार ठाकरे गटाने कोळशेवाडी पोलीस ठाण्यात केली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करीत असल्याने ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने पुढाकार घेऊन हे नगरसेवक बेपत्ता असल्याचे पोस्टर शहरात चिटकवले होते. याप्रकरणी मधुर म्हात्रे यांच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस या तक्रारीनंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना याप्रकरणी चौकशीसाठी बोलवण्याकरता दबाव टाकत होते. या दबावामुळेच ठाकरे गटाचे पदाधिकारी रमेश तिखे यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा आज पहाटे हृदयविकाराने मृत्यू झाला. हा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, रमेश तिखे हे कल्याण पूर्व परिसरातील करपेवाडी परिसरात राहत होते. बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर चिटकवण्याकरिता तेही सहभागी झाले होते. बेपत्ता नगरसेवक कुठे आढळल्यास ठाकरे गटाच्या शाखेला संपर्क साधावा अशा आशयाचा मजकूर त्या पोस्टरवर लिहिण्यात आला होता. बेपत्ता नगरसेवक प्रकरण पोस्टर चिटकवल्याने बेपत्ता नगरसेवकांची बदनामी होत असल्याचा आरोप त्यांचे नातेवाईक दिव्येश म्हात्रे यांनी केला होता. याप्रकरणी म्हात्रे यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दिली होती.
आणखी वाचा
Comments are closed.