ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार, झोकात धावली ठाण्याची मेट्रो

ठाण्यात मेट्रोची यशस्वी ट्रायल घेण्यात आली, त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यान मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र अनुपस्थित होते.
कॅडबरी जंक्शन ते गायमुख या 10 किमीच्या मार्गावर 10 मेट्रो स्थानके आहेत. कॅडबरी जंक्शन, माजिवडा, कापुरबावडी, मानपाडा, टिकुजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीपाडा आणि गायमुख या स्थानकांदरम्यान ही मेट्रो सेवा चालवली जाणार आहे. तर दुसरीकडे वडाळा-कासारवडवली-गायमुख यामधील मेट्रो-4 आणि मेट्रो-4 ए मार्गाचे काम सुरू आहे.
Comments are closed.