ठाणे महानगरपालिका अॅथलेटिक्स योजनेने जिंकली दोन सुवर्णांसह सहा पदके
पश्चिम विभाग कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धेत ठाणे महानगरपालिका अॅथलेटिक्स योजनेने दोन सुवर्णांसह एकूण सहा पदके जिंकली आहेत. 37 वी पश्चिम विभाग कनिष्ठ अॅथलेटिक्स स्पर्धा नुकतीच बांबोलिम, गोवा येथील अटल अॅथलेटिक्स स्टेडियमवर आयोजित करण्यात आली होती.
श्रेष्ठा शेट्टीने (महिला-20 वर्षांखालील गट) लांब उडीत सुवर्णपदक आणि 4 बाय 100 मीटर मिश्र रिले शर्यतीत रौप्यपदक पटकावले. रिसा फर्नांडिसने (मुली-16 वर्षांखालील गट) लांब उडीत रौप्यपदक जिंकले. काव्या कानगाळेने (मुली-14 वर्षांखालील गट) ट्रायथलॉन ‘ए’ प्रकारात रौप्यपदक मिळवले. अनिरुद्ध नंबुद्रीने (मुले-16 वर्षांखालील गट) 600 मीटर शर्यतीत रौप्यपदक आणि मेडली रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले. नीलेश पाटकर हे या सर्व खेळाडूंचे प्रशिक्षक असून त्यांनी या स्पर्धेसाठी अथक मेहनत घेतली होती.
पदक जिंकल्यावर अनिरुद्ध म्हणाला, ‘मी 600 मीटर शर्यतीत माझी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. माझ्या प्रशिक्षकाने आखलेल्या रणनीतीनुसारच मी ही शर्यत धावलो आणि त्याचा मला चांगलाच फायदा झाला.’
ठाणे महानगरपालिका अॅथलेटिक्स योजनेने या स्पर्धेच दमदार कामगिरी करत घवघवीत यश मिळवले आहे. काव्या म्हणाली, ‘मी आणखी चांगली कामगिरी करू शकले असते, तरीही हे माझे पहिले राष्ट्रीय पदक आहे आणि आगामी स्पर्धांमध्ये माझी कामगिरी सुधारण्याबाबत मी आशावादी आहे.’
मीनल पालंदे (अतिरिक्त आयुक्त ) आणि अशोक आहेर (योजना प्रमुख) यांनी खेळाडूंचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले असून आगामी स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments are closed.