Thane News – स्टेअरिंग लॉक झाल्याने मुरबाड-शहापूर एसटीला अपघात, 25 ते 30 प्रवासी जखमी

मुरबाडहून शहापूरला जाणाऱ्या एसटीला अपघात झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. बसचा बेल्ट तुटल्याने बसचे स्टेअरिंग लॉक झाले. यामुळे बस अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला पलटली. यात 25 ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मुरबाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुरबाड-शहापूर बस नियमित वेळेप्रमाणे मुरबाडहून शहापूरकडे रवाना झाली. बसमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह 60 ते 65 प्रवासी होते. कुडवली गावाजवळ येताच बसचा बेल्ट तुटल्याने स्टेअरिंग लॉक होऊन बस अनियंत्रित झाली. यामुळे बस पलटली.
बस पलटल्यामुळे डिझेलच्या टाकीतून गळती झाली. यामुळे काही वेळाने बसने पेट घेतला. या आगीत बस जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.
Comments are closed.