कामगाराची हत्या करून पगार चोरला; काश्मिरमध्ये धडक देत आरोपी जेरबंद, भिवंडीत निजामपुरा पोलिसांची कारवाई

पैशांसाठी सहकारी कामगाराची हत्या करत पगार चोरून पसार झालेल्या आरोपीला जेरबंद करण्यात निजामपुरा पोलिसांना यश मिळाले आहे. साबीर अन्सारी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून हत्येनंतर तो फरार झाला होता. याप्रकरणी निजामपुरा पोलिसांच्या पथकाकडे कोणतेही पुरावे नसताना त्यांनी रेल्वे पोलीस, सीसीटीव्ही आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने कसोशीने तपास करत जम्मू काश्मीर येथे धडक देत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

क्राईम विश्वकर्मा याच्या डोक्यात हातोड्याचे फाईल

4 फेब्रुवारी रोजी साबीरने पैशांच्या मोहापोटी कंपनीतील नीरजकुमार घाव घालून गंभीर जखमी केले. त्यानंतर नीरजकुमार याच्याकडील पैसे आणि मोबाईल घेऊन पोबारा केला. दरम्यान 18 फेब्रुवारी रोजी नीरजकुमार याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर भिवंडी पोलिसांना साबीर कश्मीर येथे पळून गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने लालचौक, अनंतनाग येथील एका बेकरीतून अन्सारीला ताब्यात घेतले.

मुलासोबत अश्लील चाळे; वॉर्डबॉयला अटक

उपचार घेत असलेल्या आईच्या देखभालीसाठी रुग्णालयात थांबलेल्या अल्पवयीन मुलासोबत वॉर्डबॉयने अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली आहे. पीडित मुलाची आई आजारी असल्याने तिला कामोठे येथील एका सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रात्री आईच्या देखभालीसाठी रुग्णालयात थांबला होता. दरम्यान मुलगा झोपल्यानंतर वॉर्डबॉयने त्याच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. यावेळी घाबरलेल्या मुलाने आरडाओरडा केला असता हा प्रकार उघडकीस आला.

Comments are closed.