ओव्हरटेक करणं जीवावर बेतलं, डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू

ओव्हरटेक करताना भरधाव डंपरने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडल्याची घटना उत्तन रोडवरील मॅक्सेस मॉलजवळ घडली. या अपघातात दिनेश माली (55) व मंजू माली (50) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी भाईंदर पोलिसांनी डंपरचालक जाफर देशमुख (52) याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दिनेश हे पत्नीसोबत दुचाकीने उत्तन येथून भाईंदरच्या दिशेने जात असताना एका भरधाव डंपरने त्यांना ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बेदरकार डंपरचा धक्का लागल्याने दिनेश यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते दोघेही खाली कोसळून दोघेही डंपरच्या पुढच्या चाकाखाली चिरडले गेले. या दुर्घटनेत दिनेश यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी मंजू यांना गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी तत्काळ मंजू यांना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच भाईंदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बेदरकार डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. तसेच दिनेश व त्यांच्या पत्नीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात पाठवला आहे.
Comments are closed.