Bhiwandi Wall Collapse – भिवंडीत भिंत अंगावर कोसळल्याने माय-लेकीचा मृत्यू, वडील जखमी

झोपेत असताना घराची भिंत अंगावर कोसळल्याने मायलेकीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीत घडली. दुर्घटनेत वडील जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भिवंडीतील पाथरेडी गावात रविवारी दुपारी 2 च्या सुमारास ही घटना घडली. सुजित सोमैया असे मयत महिलेचे तर राहुल असे जखमी पतीचे नाव आहे.

राहुलचे पाथरेडी गावात तीन मजली मातीचे घर होते. जोरदार वाऱ्यामुळे मातीची भिंत कोसळली. यावेळी सुजित सोमैया आणि तिची एक वर्षाची मुलगी घरी झोपल्या होत्या. याचदरम्यान भिंत त्यांच्या अंगावर कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पती राहुल हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचारा सुरू आहेत. घटनेची माहिती मिळतात स्थानिक पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Comments are closed.