घोडबंदर रोडवर आजपासून दोन दिवस वाहतूक बदल, ब्रह्मांड जंक्शन पादचारी पुलावर गर्डर उभारणी मोहीम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ब्रह्मांड जंक्शन येथील पादचारी पुलावर गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे घोडबंदर रोडवर उद्यापासून दोन दिवस वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. यादरम्यान अवजड वाहनांनी या मार्गावरून प्रवास करणे टाळावे, असे आवाहन ठाणे वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.

बह्मांड जंक्शन येथे पादचारी पुलावर गर्डर उभारण्याचे काम 8 मे ला रात्री 11.55 वाजल्यापासून 9 मे रात्री 11.55 वाजेपर्यंत तसेच 9 मे रात्री 11.55 वाजल्यापासून 10 मे रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत वाहतूककोंडी टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी या मार्गांवर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. यामध्ये पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नसल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले.

हा मार्ग बंद

  • ब्रह्मांड सिग्नलकडून कापूरबावडीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
  • एमजी मोटर्स शोरूम, मानपाडा येथून मानपाडा ब्रिजवर जाणाऱ्या वाहनांनाही ब्रिज चढणीवर प्रवेश बंद असेल.

पर्यायी मार्ग

  • ब्रह्मांड सिग्नलवर डावीकडे वळून आझादनगर रोड, लोढा अमारा चौक, कोल शेत-ढोकाळी रोडमार्गे कापूरबावडीकडे जावे.
  • घोडबंदरवरून येणाऱ्या वाहनांना मानपाडा ब्रिजलगतच्या स्लिप रोडने डावीकडे वळून टिकुजीनीवाडी सर्कल मार्गे निलकंठ ग्रीनसमोरील रस्त्याने मुल्लाबाग कटमार्गे इच्छितस्थळी जावे.

Comments are closed.