पहिल्या दिवशी शून्य अर्ज, नगर परिषद, नगरपंचायत निवडणूक; ठाणे, पालघर, रायगडात निरंक

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील 15 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे पहिल्या दिवसाची अर्ज संख्या शून्य राहिली. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत येत्या 17 नोव्हेंबरपर्यंत आहे. मात्र याच कालावधीत येत्या रविवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी फक्त सहा दिवसांचा कालावधी उरला आहे.

पालघर जिल्ह्यातील राणा जव्हार, स्थानिक स्वराज्य पंचायत, रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पालघर या नगर परिषदांसह वाडा नगर कर्जत, खोपोली, महाड, माथेरान, मुरुड-जंजिरा, पेण, रोहा, श्रीवर्धन, उरण, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ आणि कुळगाव-बदलापूर या नगर परिषदांची निवडणूक येत्या 2 डिसेंबर रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात आजपासून करण्यात आली. त्यानुसार नामनिर्देशनपत्र निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले. मात्र पहिल्याच दिवशी कोणत्याच नगर परिषदेत आणि नगरपंचायतीमध्ये एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा कालावधी निवडणूक आयोगाने 10 ते 17 नोव्हेंबर असा निश्चित केला आहे. 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदरमध्ये आज प्रभाग आरक्षण सोडत
ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर निवड पार्कदा मालिकांच्य आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ठाणे पालिकेची सोडत गडकरी रंगायतनमध्ये, नवी मुंबई पालिकेची सोडत वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात, कल्याण-डोंबिवली पालिकेची सोडत आचार्य अत्रे रंगमंदिरात आणि मीरा-भाईंदर पालिकेची सोडत मीरा रोड येथील आप्पासाहेब धर्माधिकारी सभागृहात निघणार आहे

निवडणूक यंत्रणेची दमछाक होणार
उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिलाच दिवस निरंक गेला आहे. त्यामुळे आता अर्ज दाखल करण्यासाठी फक्त सहा दिवस उरले आहेत. जर आणखी एक ते दोन दिवस हीच स्थिती राहिली तर उरलेल्या दिवसात उमेदवारी अर्ज जमा करताना निवडणूक यंत्रणेची मोठी दमछाक होणार आहे. पोलीस यंत्रणा आणि प्रशासनावरही ताण पडणार आहे, अशी प्रतिक्रिया निवडणुक आयोगाच्या सुत्रांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.