रिंग रूट मेट्रोविरोधात ठाणेकर रस्त्यावर, प्रशासनाचा अभ्यास कच्चा; लोकप्रतिनिधींच्या सरबत्तीपुढे अधिकारी गडबडले, पोखरण रोडवर मानवी साखळी
१२ हजार कोटींहून अधिक खर्च करून लादल्या जाणाऱ्या इंटिग्रल रिंग मेट्रोच्या विरोधात आज ठाणेकर पुन्हा रस्त्यावर उतरले. भरपावसात पोखरण रोड क्रमांक २ येथील स्वामी जंक्शन ते प्रशांत कॉर्नरपर्यंत मानवी साखळी आंदोलन करून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला. मुसळधार पावसाची पर्वा न करता शेकडो स्थानिक नागरिक, नोकरदार, व्यावसायिक, आणि पर्यावरणप्रेमी या आंदोलनात सहभागी झाले.
गेल्या आठवड्यातील स्वाक्षरी मोहिमेनंतर आज सकाळी पोखरण रोडवर ठाणे अगेन्स्ट इंटिग्रल रिंग मेट्रो या मंचाच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी सलग दुसऱ्या रविवारी तीव्र निदर्शने केली. १२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असलेला हा प्रकल्प ठाणेकरांवर लादला जात असून त्याऐवजी शहराला खड्डेमुक्त रस्ते, पाण्यासाठी धरण आणि विद्युत बसगाड्यांची अधिक गरज असल्याचा दावा आंदोलकांनी केला. रिंग मेट्रो मार्गामुळे विस्थापित होणाऱ्या रहिवाशांच्या व व्यावसायिकांच्या पुनर्वसनाबाबत महामेट्रोकडे कोणतीही ठोस उत्तरे नाहीत. तसेच या कामामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असल्याचा आरोप यावेळी संतप्त नागरिकांनी केला. मुख्य मेट्रो ४ आणि ५ पूर्ण झाल्यानंतर आधी त्यांची प्रवासी संख्या तपासावी आणि त्यानंतरच अंतर्गत रिंग मेट्रोची गरज आहे का, याचा अभ्यास करावा अशी मागणी नागरिकांनी यावेळी केली आहे.
रिंग रूट मेट्रो प्रकल्पाच्या संदर्भात ठाणेकरांच्या मनात अनेक शंका असताना या प्रकल्पाचे सादरीकरण शुक्रवारी पालिकेच्या सभागृहात करण्यात आले होते. या बैठकीला महामेट्रोचे अधिकारी, ठाण्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीय नगरसेवक हजर होते. प्रकल्पाच्या मार्गिका, भूमिगत मेट्रो, भूसंपादन, बाधित बांधकामे, पुनर्वसन आणि क्लस्टरच्या माध्यमातून होणाऱ्या पुनर्वसनावरून जोरदार चर्चा झाली. प्रकल्पामध्ये नेमके किती नागरिक आणि कुटुंबे विस्थापित होणार आहेत याचे सर्वेक्षणच झाले नसल्याची गंभीर बाब यावेळी समोर आली. विस्थापितांची संख्या निश्चित नाही, पुनर्वसनाची ठोस व्यवस्था नाही, तर प्रकल्पाची अंमलबजावणी कशी करणार, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या सरबत्तीपुढे महामेट्रोचे अधिकारी गडबडलेले पाहायला मिळाले. त्यामुळे ठाण्याच्या या रिंग रूट मेट्रोविषयी प्रशासनाचा अभ्यास कच्चा असल्याचेच यावरून लक्षात येते.
ऐकून घ्यावे, तोपर्यंत रिंग रूट मेट्रो प्रकल्प थांबवावा. ठाण्याच्या भविष्याचे निर्णय बंद दाराआड न घेता जनतेशी पारदर्शकपणे संवाद साधून घ्यावे. प्रशासनाने नागरिकांचे म्हणणे
अॅड. राधिका राणे (आंदोलनकर्त्या)
Comments are closed.