Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
गेल्या अनेक महिन्यात ठाणे महानगरपालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस अजून सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधणारे आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेत झालेल्या युतीसंदर्भात समाधानी नाही, मात्र व्यापक हित महत्वाचे असल्याने युतीत काम करणार असे मत व्यक्त केले आहे. जर युती झाली नसती तर नक्कीच भाजपच्या प्रचंड जागा निवडून आल्या असत्या. मात्र आता युती मध्ये असल्याने पूर्ण वेळ युतीचे उमेदवार निवडून येण्यासाठी काम करणार असल्याचे देखील संजय केळकर यांनी सांगितले आहे. संजय केळकर यांनी गेल्या काही महिन्यात रस्ते निर्माणासाठी ठाण्यात आणलेला निधी, विविध प्रकल्पासाठी आणलेला निधी, रखडलेले प्रकल्प आणि ठाणे महानरपालिकेतील अनधिकृत कामे तसेच अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार यावर आवाज उठवला होता. त्म्याद्वारे त्यांनी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला होता. स्वबळाचा नारा देखील सर्वप्रथम त्यांनीच दिला होता. मात्र वरिष्ठांना अचानक युती केल्याने केळकर यांची थोडी नाराजी आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी….
Comments are closed.