उल्हासनगर हादरलं! किरकोळ वादातून 30 वर्षीय युवकाची हत्या, 15 ते 20 जणांच्या टोळक्याने धारदार श
ठाणे उल्हसनगर गुन्हेगारीच्या बातम्या: उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एक धक्कादायक घटना घडली आहे. उल्हासनगरमधील कॅम्प 1 येथील साईबाबा मंदिर परिसरात किरकोळ वादातून 30 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या करण्यात आली आहे. साजिद शेख असं हत्या केलेल् युवकाचं नाव आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत. या प्रकरणी पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
15 ते 20 जणांच्या टोळक्याने केला हल्ला
1 ऑगस्ट रोजी सायंकाळी साजिद शेख आणि रोहित पासी यांची भेट झाली होती. याआधी त्यांच्यात झालेल्या वादावर चर्चा करण्यासाठी हे दोघे पुन्हा एकत्र आले होते. मात्र, चर्चा शांततेने न सुटता वाद उग्र झाला. त्या रात्री सुमारे अडीच वाजता साजिदचा मित्र रोहित पासी आणि त्याचा साथीदार प्रवीण उज्जीनवाल यांनी अडवला. त्यानंतर साजिदला फोन करून बोलावून घेतलं. साजिद मदतीसाठी घटनास्थळी पोहोचताच, आधीपासूनच दबा धरून बसलेल्या 15 ते 20 जणांच्या टोळक्याने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. गंभीर जखमांमुळे साजिदचा जागीच मृत्यू झाला. ही थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मी साजिदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही
उल्हासनगर पोलिसांनी आरोपी रोहित पासी आणि प्रवीण उज्जीनवाल यांना अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. साजिदची गरोदर पत्नी मोठ्या दु:खात असून, सर्व आरोपींना अटक होईपर्यंत मी साजिदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा तीव्र आक्रोश करत आहे.
रत्नागिरीl दोन कामगारांचा वाद विकोपाला, एकाची हत्या
रत्नागिरी शहरातील मिरकर वाडा येथे फर्निचरचे काम सुरु असलेल्या एका दुकानात दोन कामगारांमध्ये झालेल्या वादानंतर एका कामगाराच्या छातीत धारदार हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत हल्ला झालेला कामगार जागीच गतप्राण झाला. मिळालेल्या माहितीनुसार मिरकर वाड्यातील एका दुकानात फर्निचरचे काम सुरु होते. याच ठिकाणी काम करणाऱ्या दोन कामगारांमध्ये काही कारणावरुन जोरदार वाद झाला आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की, एका कामगाराने दुसऱ्या कामगारावर धारदार हत्याराने हल्ला केला. छातीत वर्मी घाव बसल्याने जखमी कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या घटनेनंतर फरार झालेल्या दोन संशयितांना पोलिसांनी रत्नागिरी रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मिरकर वाडा परिसरात तणावाचे वातावरण असून, स्थानिक नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असून, लवकरच या गुन्ह्याचा छडा लागेल अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या:
अमरावतीतील महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उलगडलं; पतीनेच रचला कट, मित्रांनाही घेतलं सोबत
आणखी वाचा
Comments are closed.