पीएमओचा पत्ता 78 वर्षानंतर बदलेल.
एक्झिक्युटिव्ह एन्क्लेवमध्ये स्थलांतरित होणार : अत्याधुनिक सुविधांनी युक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान कार्यालय म्हणजेच पीएमओ सध्या साउथ ब्लॉकमध्ये आहे, परंतु पुढील महिन्यात पीएमओला एक्झिक्युटिव्ह एन्क्लेवमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या अंतर्गत तयार करण्यात आलेल्या नव्या एन्क्लेवमध्ये पंतप्रधान कार्यालयासोबत कॅबिनेट सचिवालय, राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय आणि अत्याधुनिक कॉन्फरन्सिंग सुविधा देखील असणरा आहे. हे नवे पीएमओ पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या अधिक नजीक असणार आहे.
नव्या भवनांच्या निर्मितीची आवश्यकता मुख्यत्वे जागेची कमतरता आणि जुन्या कार्यालयांमध्ये आधुनिक सुविधांच्या अभावामुळे जाणवली होती. पंतप्रधानांनी अलिकडेच गृह मंत्रालय आणि कार्मिक मंत्रालयाचे नवे कार्यालय ‘कर्तव्य भवन-3’चे उद्घाटन करताना प्रशासकीय यंत्रणा अद्याप ब्रिटिशकालीन इमारतींमधून काम करत होती, ज्यात पुरेशी जागा, प्रकाश आणि व्हेंटिलेशनची कमतरता होती असे उद्गार काढले होते. सूत्रांनुसार नव्या पीएमओला नवे नावही दिले जाण्याची शक्यता आहे. हे नाव ‘सेवे’च्या भावनेला दर्शविणारे असू शकते. पीएमओ जनतेचे असावे, हे मोदीचे पीएमओ नाही असे पंतप्रधानांनी स्वत:च्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या संबोधनात म्हटले होते.
तर दुसरीकडे नॉर्थ ब्लॉक आणि साउथ ब्लॉक हे जवळपास 8 दशकांपासून केंद्र सरकारचे ‘नर्व सेंटर’ राहिले आहेत, आता त्यांना संग्रहालयात रुपांतरित केले जाणार आहे. त्यांना ‘युगे युगीन भारत संग्रहालय’चे स्वरुप देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत राष्ट्रीय संग्रहालय आणि फ्रान्स म्युझियम्स डेव्हलपमेंटदरम्यान करार झ्ा़ाला आहे. हे संग्रहालय भारताच्या सांस्कृतिक वारशाला प्रदर्शित करेल आणि आमचा गौरवशाली इतिहास, वर्तमान आणि भविष्याची झलक सादर करणार असल्याचे सरकारचे सांगणे आहे.
Comments are closed.