हवाई दल माझ्या आयुष्यातील महान शिक्षक आहे.

शुभांशु शुक्ला यांनी व्यक्त केले अनुभव

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीत गगनयात्रींच्या सन्मान सोहळ्यादरम्यान भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी स्वत:च्या जीवनातील अनुभव मांडले आहेत. वायुदलाची पार्श्वभूमी आणि कॉकपिट माझ्या जीवनातील सर्वात महान शिक्षक आहेत. इतकी तयारी आणखी कुणी केली असती तरीही माझ्यासारखा तो कामगिरी करू शकला असता असे मी मानतो असे शुभांशु यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी कार्यक्रमात अंतराळ वास्तव्यादरम्यान केलेले चित्रिकरण लोकांना दाखविले आहे.

मी ज्या गोष्टींना सामोरा गेलो किंवा जे काही प्राप्त करू शकलो, त्यात या गणवेशात आणि वायुदलात राहून माझी जी पार्श्वभूमी राहिली किंवा अनेक वर्षांपर्यंत जी तयारी केली, त्याची मोठी भूमिका राहिली आहे. याच्या आधारावर आमच्यापैकी कुणीही तितकेच चांगले काम करू शकत होता. हाच आत्मविश्वास माझ्यामध्येही आहे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाकडे पाहतो, तेव्हा वायुदलाची पार्श्वभूमी माझ्यासाठी विशेष असल्याचे वाटते असे शुभांशु यांनी म्हटले आहे.

माझ्याकडे अंतराळातून केलेल्या चित्रणाची एक छोटी क्लिप आहे. याच्या मदतीने मी भारताची छायाचित्रे टिपण्याचा प्रयत्न केला होता. अंतराळातून भारत खरोखरच अत्यंत सुंदर दिसतो. अंतराळ स्थानकावरील कुठल्याही अंतराळवीराशी बोलला तर देशाची अनोखी स्थित आणि आकाराने प्रत्येक जण प्रभावित असल्याचे कळले. खासकरून रात्रीच्या वेळी हिंदी महासागराच्या दक्षिणेकडून उत्तरेच्या दिशेने जात असताना मी माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दृश्य अनुभवले होते असे उद्गार शुभांशु यांनी काढले आहेत. अंतराळात जाण्याचे स्वप्न मी युवावसथेत कधीच पाहिले नव्हते. मी राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक अंतराळ उड्डाणाच्या कहाण्या ऐकल्या होत्या. परंतु अंतराळ प्रवासाचे स्वप्न माझ्या जीवनात प्रारंभिक टप्प्यात आले नव्हते अशी कबुली शुभांशु यांनी दिली.

Comments are closed.