हवाई दलास नवीन लढाऊ विमान प्राप्त होईल.
निविदा प्रक्रियेत अमेरिकेचे एफ-15 होऊ शकते सामील
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदल स्वत:चे सामर्थ्य वाढविण्यासाठी 114 नव्या मध्यम श्रेणीच्या लढाऊ विमानांच्या खरेदीची तयारी करत आहे. वायुदल पुढील 4-5 वर्षांमध्ये जागतिक निविदेच्या माध्यमातून या विमानांना स्वत:च्या ताफ्यात सामील करू इच्छिते. यासाठीच्या स्पर्धेत बोइंग, लॉकहीड मार्टिन, दसॉल्ट आणि साब समवेत अनेक मोठ्या कंपन्या सामील होऊ शकतात.
जागतिक निविदेचा हिस्सा होणाऱ्या विमानांमध्ये राफेल, ग्रिपेन, यूरोफायटर टायफून, मिग-31 आणि अमेरिकन एफ-16, एफ-16 विमान सामील आहे. यातील एफ-15 वगळता अन्य लढाऊ विमानांनी यापूर्वीच 126 बहुउद्देशीन लढाऊ विमानांसाठीच्या मागील निविदा प्रक्रियेत भाग घेतला होता आणि त्यांचे मूल्यांकन देखील झाले आहे. यंदाच्या शर्यतीत सामील होणारे एकमात्र नवे विमान अमेरिकन कंपनी बोइंगचे एफ-15 स्ट्राइक ईगल लढाऊ विमान असेल.
114 बहुउद्देशीय लढाऊ विमानांना सामील करण्यात आल्यास वायुदलाला पुढील 10 वर्षांपर्यंत स्वत:च्या स्क्वाड्रनची शक्ती कायम राखण्यास मदत मिळणार आहे. याचबरोबर मार्क 1 ए आणि मार्क-2 समवेत हलके लढाऊ विमान देखील वायुदलात सामील केले जाणार आहे.
संरक्षणमंत्र्यांना सोपविला अहवाल
संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने अलिकडेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना स्वत:चा अहवाल सोपविला आणि वायुदलाला स्वत:च्या लढाऊ क्षमतांना वाढविण्यास मदत करण्यासाठी 114 बहुउद्देशीय लढाऊ विमाने प्राप्त करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. वायुदल 2037 पर्यंत लढाऊ विमानांच्या 10 स्क्वाड्रन्सला निवृत्त करणार आहे.
वायुदल 2047 पर्यंत 60 लढाऊ विमानांच्या स्क्वाड्रन्सची क्षमता प्राप्त करू इच्छिते. पुढील 5-10 वर्षांमध्ये या लढाऊ विमानांना ताफ्यात सामील केल्यास दोन आघाड्यांवर युद्धाला सामोरे जाण्याची क्षमता आणखी वाढणार असल्याचे वायुदलाचे मानणे आहे.
मिराज-2000, मिग-29 निवृत्त होणार
पुढील 10-12 वर्षांमध्ये वायुदलाच्या ताफ्यातून जग्वार, मिराज-2000 आणि मिग-29 लढाऊ विमानांना निवृत्त केले जाणार आहे. मिग श्रेणीच्या जुन्या विमानांना टप्पाबद्ध पद्धतीने हटविणे तसेच एलसीए मार्क 1 आणि मार्क 1 ए यासारख्या नव्या स्वदेशी विमानांना सामील करण्यास विलंब होत असल्याने वायुदलात लढाऊ विमानांच्या संख्येत घट दिसून येत आहे. वायुदल मागील काही वर्षांमध्ये केवळ 36 राफेल विमानांनाच स्वत:च्या ताफ्यात सामील करू शकले आहे.
Comments are closed.