गेल्या 5 वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बादशाह कोण? रोहित शर्मा की विराट कोहली?
विराट कोहली वि रोहित शर्मा गेल्या 5 वर्षांच्या आकडेवारी: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी20 आणि कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. आता फक्त वनडे फॉरमॅट शिल्लक आहे, ज्यात चाहते या दोन्ही अनुभवी खेळाडूंना खेळताना पाहू शकतील. विराटने 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं, तर रोहित त्याच्या एक वर्ष आधीच भारतासाठी पहिला सामना खेळला होता. दोघांच्या कारकिर्दीला जवळपास दोन दशके पूर्ण होत आहेत. आता 2025 मध्ये, गेल्या 5 वर्षांत कसोटी, वनडे आणि टी20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण सर्वाधिक धावा कोणी केल्या आहेत? चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊयात. (Virat Kohli vs Rohit Sharma)
2021च्या सुरुवातीपासून आतापर्यंतच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, रोहित शर्माने भारतासाठी एकूण 162 आंतरराष्ट्रीय डावांमध्ये फलंदाजी करताना 5,671 धावा केल्या आहेत. 5 हजारांहून अधिक धावा करताना रोहितने 10 शतके आणि 34 अर्धशतके झळकावली आहेत. रोहितने 2024च्या विश्वचषकानंतर टी20 मधून निवृत्ती घेतली, तर मे 2025 मध्ये त्याने कसोटी फॉरमॅटलाही अलविदा केला.
दुसरीकडे, विराट कोहलीने 2021 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 149 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. या डावांमध्ये विराटने एकूण 5,313 धावा केल्या आहेत. विराटने रोहितपेक्षा 23 डाव कमी खेळले आहेत, परंतु एकूण धावांच्या बाबतीत ‘हिटमॅन’ पुढे आहे. विराटने गेल्या 5 वर्षांत 12 शतके आणि 35 अर्धशतके ठोकली आहेत. (Most international runs since 2021)
विराट कोहली आणि रोहित शर्मा आता फक्त वनडे सामने खेळणार असल्याने, त्यांचे पुनरागमन भारतीय संघाच्या पुढील वनडे मालिकेत होऊ शकते. भारतीय संघ ऑक्टोबरमध्ये 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे. ही मालिका 19 ते 25 ऑक्टोबरदरम्यान खेळली जाईल. सर्व काही ठीक राहिल्यास विराट आणि रोहित या मालिकेत खेळताना दिसू शकतात. (ODI comeback Virat Kohli Rohit Sharma 2025)
Comments are closed.