दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला कोकणच्या सौंदर्याची भुरळ; सैतवडे गावात ‘रावडी जनार्दन’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू

कोकणच्या निसर्ग सौंदर्याकडे हिंदी चित्रपटसृष्टीने दुर्लक्ष केले असले तरी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी कोकणच्या सौंदर्याची भूरळ पडली आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील  ‘रावडी जनार्दन’ या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सैतवडे गावात सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून गावातील गुंबद ग्रामपंचायत हद्दीमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा सेट उभारण्यात आला आहे.

या चित्रपटात  सुपरस्टार विजय देवरकाsंडा आणि अभिनेत्री कीर्ती सुरेश हे मुख्य भूमिकेत आहेत. चित्रीकरणासाठी मोठा बंदोबस्त  ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे सैतवडे गावातील दी मॉडेल इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर जिल्हाधिकारी कार्यालयाचा भव्य सेट उभारण्यात आला आहे.

‘रावडी जनार्दन’ या चित्रपटाची पार्श्वभूमी 1900 सालातील असून त्यावेळच्या ब्रिटिशकालीन राजवटीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. सैतवडे येथील चित्रीकरण पूर्ण झाल्यावर पुढील शुटिंग गावाशेजारच्या वरवडे येथे होणार आहे. जवळपास 60 ते 70 वर्षांपूर्वी सैतवडे गावात ‘सागर प्रेमी सैतवडे’ या चित्रपटाचे चित्रीकरण झाले होते. त्यानंतर इतक्या मोठय़ा कालावधीनंतर पुन्हा एकदा गावात चित्रीकरण होत आहे.

Comments are closed.