पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत द बिग डिंक्स संघाला विजेतेपद

पुण्यात 9 मार्च, 2026 रोजी पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पहिल्या पीवायसी- पुसाळकर फाउंडेशन पिकलबॉल साखळी स्पर्धेत अंतिम फेरीत द बिग डिंक्स संघाने बीएम स्मॅशर्स संघाचा 5-2 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना येथील पिकलबॉल कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम लढतीत द बिग डिंक्स संघाने बीएम स्मॅशर्स संघाचा 5-2 असा पराभव केला. सामन्यात खुल्या दुहेरी 1मध्ये डिंक्स संघाच्या अनिश राणे व आर्यन सुतार यांनी आरिन माळी व तनिश बेलगलकर यांचा 11-07 असा तर, खुल्या दुहेरी 2मध्ये डिंक्स संघाच्या मिहीर ठोंबरे व नकुल ओगले यांनी स्मॅशर्सच्या अनिकेत शिंदे व प्रतीक धर्माधिकारी यांचा 11-03 असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. मिश्र दुहेरी 1मध्ये स्मॅशर्सच्या रियान माळी व इशा पाठक या जोडीने योगेश भोगाशेट्टी व सृष्टी खटोड यांचा 15-07 असा पराभव करून हि आघाडी कमी केली. वरिष्ठ दुहेरीत डिंक्स संघाच्या कौस्तुभ वाळिंबेने सौरभ प्रभुदेसाईच्या साथीत अमोल मेहेंदळे व जया पाटणकर यांचा 15-12 असा तर, खुल्या दुहेरीत 3मध्ये डिंक्स संघाच्या भाग्यश्री देशपांडे व अयान जमेनीस यांनी वेदांत खटोड व निहिल दर्डा यांचा 15-11 असा पराभव करून संघाला विजयी आघाडी मिळवून दिली. खुल्या दुहेरी 4मध्ये स्मॅशर्सच्या अमर श्रॉफ व सिद्धार्थ बदामीकर यांनी सुमीत कालकर व आनंद आपटे यांचा 11-09 असा पराभव केला.
स्पर्धेतील विजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव दिपक गाडगीळ, सहसचिव सारंग लागू, चॅम्पियन स्पोर्ट्सचे अमित मदन, साहिल मदन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नंदन डोंगरे, आमोद प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते.
बाहेर पडा: शेवटची फेरी:
द बिग डिंक्स वि.वि.बीएम स्मॅशर्स 5-2(खुला दुहेरी 1: अनिश राणे/आर्यन सुतार वि.वि.आरिन माळी/तनिश बेलगलकर 11-07; खुला दुहेरी 2: मिहीर ठोंबरे/नकुल ओगले वि.वि.अनिकेत शिंदे/प्रतीक धर्माधिकारी 11-03; मिश्र दुहेरी 1: योगेश भोगाशेट्टी/सृष्टी खटोड पराभुत वि.रियान माळी/इशा पाठक 07-15; वरिष्ठ दुहेरी: कौस्तुभ वाळिंबे/सौरभ प्रभुदेसाई वि.वि.अमोल मेहेंदळे/जया पाटणकर 15-12; खुला दुहेरी 3: भाग्यश्री देशपांडे/अयान जमेनीस वि.वि.वेदांत खटोड/निहिल दर्डा 15-11; खुला दुहेरी 4: सुमीत कालकर/आनंद आपटे पराभुत वि.अमर श्रॉफ/सिद्धार्थ बदामीकर 09-11);
इतर बक्षिसे:
सर्वोत्कृष्ट जोडी(ब्रॉन्झ): भाग्यश्री देशपांडे/ अयान जेमेनिस;
सर्वोत्कृष्ट जोडी(सिल्व्हर): मिहिर ठोंबरे/नकुल ओगले;
सर्वोत्कृष्ट जोडी(गोल्ड): अनिश राणे/आर्यन सुतार;
सर्वोत्कृष्ट मिश्र दुहेरी जोडी: गौतम लोणकर/मधुरा टेंबे;
५२ वर्षावरील सर्वोत्कृष्ट जोडी: तुषार नगरकर/संजीव घोलप;
सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू : वैजयंती मराठे;
३०वर्षावरील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू: इशांत रेगे;
३० वर्षाखालील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू: ईशान लागू;
सर्वोत्कृष्ट प्रौढ खेळाडू : तुषार नगरकर;
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू : आर्यन सुतार.
Comments are closed.