बाॅक्सिंग डे कसोटीसाठी भारत-ऑस्ट्रेलिया सज्ज! जाणून घ्या प्लेइंग 11, पिच रिपोर्टसह सर्वकाही

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) मालिका खेळली जात आहे. त्यातील चौथा सामना उद्या (26 डिसेंबर) रोजी खेळला जाणार आहे. आतापर्यंत 5 सामन्यांची ही कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (World Test Championship) फायनलच्या दृष्टिकोनातून दोन्ही संघांसाठी उर्वरित 2 सामने जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया संघातील चौथा कसोटी सामना मेलबर्नच्या मैदानावर रंगणार आहे. हा कसोटी सामना भारतीय वेळेनुसार पहाटे 5 वाजता सुरू होईल.

भारतीय संघ काही बदलांसह या सामन्यात उतरू शकतो. रिपोर्टवर विश्वास ठेवला, तर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. आतापर्यंत तो दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत मधल्या फळीत खेळला होता. शुबमन गिल (Shubman Gill) संघाबाहेर असू शकतो. गिलच्या जागी केएल राहुल (KL Rahul) तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो.

यानंतर विराट कोहली (Virat Kohli) चौथ्या क्रमांकावर खेळणार हे निश्चित आहे. रिषभ पंत (Rishabh Pant) पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसणार आहे. या मालिकेत पंतला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. आयसीसी कसोटी क्रमवारीतही तो टॉप-10 मधून बाहेर पडला आहे. पंतनंतर सहाव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja), सातव्या क्रमांकावर नितीशकुमार रेड्डी (Nitish Kumar Reddy) आणि आठव्या क्रमांकावर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) खेळणार असल्याची बातमी आहे.

मेलबर्नची खेळपट्टी पाहता भारतीय संघ 2 फिरकीपटूंसोबत मैदानात उतरू शकतो. नितीश आतापर्यंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहेत. अशा स्थितीत तो फलंदाज म्हणून शेवटच्या अकरामध्ये स्थान मिळवू शकतो. वेगवान गोलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर मोहम्मद सिराज (Mohammed Siraj), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि आकाश दीप (Akash Deep) हे त्रिकूट पुन्हा एकदा ॲक्शनमध्ये दिसू शकते.

मेलबर्नची खेळपट्टी फिरकीपटूंना खूप मदत करते. या कारणास्तव भारतीय संघ आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर या दोघांचा समावेश करू शकते. तसेच, येथे धावा काढणे देखील सोपे आहे. अशा परिस्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 19 वर्षीय ‘सॅम कोन्स्टास’चा (Sam Konstas) समावेश केला आहे. ‘नॅथन मॅकस्विनी’च्या (Nathan McSweeney) जागी त्याला संधी मिळाली आहे. याशिवाय दुखापतग्रस्त ‘जोश हेझलवूड’च्या (Josh Hazlewood) जागी स्कॉट बोलँड (Scott Boland) संघात आला आहे.

चौथ्या कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग 11- भारत- यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलिया- उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टास, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायॉन, मिचेल स्टार्क, स्कॉट बोलँड

महत्त्वाच्या बातम्या-

ख्रिसमस दिवशी एमएस धोनी बनला सांताक्लाॅज! धोनीचा नवा लूक एकदा पाहाच
आयसीसी कसोटी क्रमवारीत रिषभ पंतला मोठा फटका! टाॅप-10 मधून बाहेर
IND vs AUS; ऑस्ट्रेलियासाठी मेलबर्न कसोटीत पदार्पण करणारा सॅम काॅन्स्टास कोण आहे?

Comments are closed.