इमारतीत 4-5 अंश गरम वाटते.
तुम्हाला किती उष्णता जाणवणार हे तुम्ही कुठल्या बिल्डिंगमध्ये राहताय यावर निर्भर असते. शहरांमध्ये निर्माण होणाऱ्या बहुतांश इमारतींमध्ये राहणारे लोक तेथील सरासरी तापमानापेक्षा 4-5 अंश अधिक उष्णता सहन करत आहेत. पहिल्यांदाच एआयच्या मदतीने करण्यात आलेले ‘हिट रिस्क’ म्हणजेच तापमान जोखिमीच्या प्रोफायलिंगमध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
बेंगळूर येथील स्टार्टअप ‘रेजिलियन्स एआय’ने पाच शहरांच्या (बेंगळूर, लखनौ, विशाखापट्टणम, पुणे, जबलपूर) काही भागांचे हीट प्रोफायलिंग केले. यात 80 टक्के बिल्डिंग्स सामान्य तापमानापेक्षा उच्च किंवा अत्याधिक जोखिमीत असल्याचे दिसून आले. या इमारतींच्या निर्मितीची पद्धत यामागील मोठे कारण आहे. स्टार्टअपने स्थान, जमीन, हवामान, बिल्डिंग उभारणीची पद्धत, त्यात वापरण्यात आलेली सामग्री, बाहेरील स्ट्रक्चर आणि इंटीरियल यासारख्या 22 निकषांच्या आधारावर हे हीट प्रोफायलिंग केले.
पुण्यातील चाकण भाग या सर्वेक्षणात सामील करण्यात आला, हा भाग ऑटो हब आहे, येथे अनेक मोठ्या कंपन्यांचे प्रकल्प आहेत. तरीही येथील जमीन रोप लागवडीसाठी अधिक उपयुक्त असल्याने येथील तापमानाच्या दृष्टीकोनातून अधिक जोखिम नाही. याच्या तुलनेत विशाखापट्टणमच्या रेल्वे कॉलनीत जवळपास सर्व इमारती उच्च किंवा अत्याधिक जोखिमीत मोडतात. मार्च आणि जूनदरम्यान येथील तापमान 41 अंशापर्यंत पोहोचते, परंतु जोखिम अधिक असल्याने या पोर्ट सिटीच्या रेल्वे कॉलनीत लोक घरात बसलेले असतान 46 अंशापर्यंत तापमान सहन करत असतात.
बेंगळूरच्या इंदिरा नगरमध्ये 85 टक्के बिल्डिंग्समध्ये राहणारे लोक मार्च ते मेपर्यंत 37-38 अंशापर्यंत तापमान झेलतात, हे सरासरी तापमानापेक्षा 5-6 अंश अधिक आहे. जबलपूरच्या राइट टाउनमध्ये 65 टक्के घरं या उन्हाळ्यात अधिक आणि अत्याधिक जोखिमीत आहेत. केवळ अत्याधिक जोखिम असलेली घरं आणि इमारतींची संख्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. लखनौच्या गोमती नगर येथील 59 टक्के इमारती उच्च किंवा अत्याधिक जोखिमीत आहेत. कंपनीनुसार हीटची जोखिम जवळ-जवळ निर्माण करण्यात आलेल्या दोन घरांमध्ये वेगवेगळी असू शकते. घर कशाप्रकारे निर्माण करण्यात आले यावर हे निर्भर आहे. अशाचप्रकारे एकाच शहरातील दोन वेगवेगळ्या भागात उष्णतेचा कमी किंवा अधिक असू शकतो.
Comments are closed.