धाडस आणि जिद्द यामुळे देश सुरक्षित आहे

सशस्त्र सेनाध्वज दिनी पंतप्रधानांचे खास आवाहन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सशस्त्र सेनाध्वज दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या शूर सैनिकांचे स्मरण केले आहे. अतूट साहसासोबत आमच्या देशाचे रक्षण करणाऱ्या शूर पुरुष आणि महिलांबद्दल कृतज्ञना व्यक्त करतो. त्यांची शिस्त, दृढसंकल्प आणि भावना आमच्या लोकांचे रक्षण करत असल्याचे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत.

सैनिकांचा संकल्पच आमच्या देशाला मजबूत करतो. सैनिकांची प्रतिबद्धता आमच्या देशाबद्दल कर्तव्य, शिस्त आणि समर्पणाचे एक शक्तिशाली उदाहरण आहे. आता आम्ही देखील सशस्त्र सेनाध्वज दिन फंडमध्ये योगदान करुया असे आवाहन पंतप्रधानांनी नागरिकांना केले आहे.

सशस्त्र सेनाध्वज दिन साजरा करण्यामागे हुतात्मा सैनिकांचे स्मरण करणे आणि सशस्त्र दलांसाठी निधी जमविण्याचा उद्देश आहे. याच्या आयोजनाचे एक कारण सैन्याबद्दल सन्मान व्यक्त करणेही आहे. सशस्त्र सेनाध्वज दिनी भूदल, नौदल आणि वायुदलाचे प्रतिकात्मक छोटे ध्वजही वितरित करण्यात येतात. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांबद्दल ही स्वत:ची जबाबदारी पार पाडण्याची ही मोठी पद्धत देखील आहे.

सशस्त्र सेना ध्वज दिवस

सशस्त्र सेना ध्वज दिनाचा इतिहास अत्यंत जुना आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काळात हुतात्मा सैनिकांचे परिवार तसेच शारीरिकदृष्ट्या दिव्यांग झालेल्या सैनिकांसाठी निधी जमविण्यास सुरुवात करण्यात आली होती. याच्या अंतर्गत 28 ऑगस्ट 1949 रोजी तत्कालीन संरक्षणमंत्री बलदेव सिंह यांच्या अध्यक्षतेत एक समिती स्थापन करण्यात आली. समितीची स्थापना संरक्षण कर्मचाऱ्यांच्या कल्याणाला विचारात घेत करण्यात आली होती.

Comments are closed.