नक्षलवादातील तेलंगणातील कार्यकर्त्यांचे वर्चस्व संपले आहे.
एका वर्षात 10 टॉप कमांडर्सना कंठस्नान : 40 वर्षांनंतर संघटनेची धुरा इतरांकडे जाणार
वृत्तसंस्था/ रायपूर
नक्षलवादी संघटनेत पहिल्यांदाच नेतृत्व तेलंगणा कॅडरच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. थिप्पिरि तिरुपति उर्फ देवजी आणि मल्लाजी रे•ाr उर्फ संग्रामच्या आत्मसमर्पणानंतर संघटनेत नेतृत्वाचे संकट निर्माण झाले आहे. हे दोन्ही वरिष्ठ नक्षलवादी तेलंगणा पोलिसांच्या ताब्यात आहेत. देवजीच्या आत्मसमर्पणामुळे नक्षलवादातील तेलंगणा कॅडरचा दबदबाच संपुष्टात येणार असून तो जवळपास 40 वर्षांपासून नक्षलवादी हिंसेची दिशा ठरवत होता. आता संघटनेची धुरा मिशिर बेसराच्या हाती जाण्याची शक्यता आहे.
देवजी हा नक्षलवादी संघटनेच्या हिंसक पथकाचा प्रमुख होता आणि अनौपचारिक स्वरुपात भाकप (माओवादी)च्या महासचिवाची भूमिका पार पाडत होता. त्याच्या समर्पणामुळे तेलंगणा कॅडरचे वर्चस्व समाप्त झाले असून जे मागील 4 दशकांपासून हिंसक कारवायांना निर्देशित करत होते. हा नक्षलवादी संघटनेसाठी एक मोठा झटका आहे.
तेलंगणा कॅडरचे मोठे नुकसान
2025 हे वर्ष नक्षलवादाच्या तेलंगणा कॅडरसाठी विनाशकारी ठरले आहे. पेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्च 2026 पर्यंत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या संकल्पानंतर छत्तीसगड समवेत पूर्ण देशात सुरक्षा अभियानांना वेग आला आहे. याच्या परिणामादाखल मागील वर्षी एकूण 10 नक्षलवादी म्होरके मारले गेले असून यातील 7 जण तेलंगणा कॅडरचे होते. मारले गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये नक्षलवादी संघटनेचा प्रमुख नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू, जयराम उर्फ चलपति, नरसिंहा चलम उर्फ सुधाकर, उदय उर्फ गजरला रवि, मनोज उर्फ मोडेम बालकृष्णन, गुड्सा उसेंडी उर्फ कट्टा रामचंद्र रे•ाr आणि कोसा उर्फ कादरी सत्यनाराण रे•ाr यासारखी मोठी नावे सामील आहेत.
कोट्स
नक्षलवाद स्वत:च्या अंतिम घटका मोजत आहे. आम्ही रणनीति बदलली असून आता नक्षलवादी संघटनेत अविश्वासाचे वातावरण आहे. जे भटकले आहेत, त्यांच्यासाठी आत्मसमर्पणच एकमात्र सुरक्षित मार्ग शिल्लक आहे.
विजय शर्मा, छत्तीसगडचे गृहमंत्री
15 नक्षलींच्या आत्मसमर्पणाची प्रक्रिया
तेलंगणात टॉप नक्षली कमांडर देवजी आणि संग्रामच्या आत्मसमर्पणानंतर छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर नक्षलवादी संघटना सीपीआयच्या बीबीएम डिव्हिजनने देखील सामूहिक आत्मसमर्पणाचे संकेत दिले आहेत. संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने राज्याचे गृहमंत्री विजय शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात वर्तमान राजकीय-सामाजिक स्थितींचा दाखला देत सशस्त्र संघर्षाचा मार्ग सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. बीबीएम डिव्हिजनचे 15 सदस्य आत्मसमर्पणाच्या प्रक्रियेत असून यातील 14 छत्तीसगड तर एक तेलंगणातील आहे.
नक्षलवादी संघटनेत काय चाललंय?
1 मागील 40 वर्षांपासून नक्षलवादी कारवायांचा रिमोट कंट्रोल तेलंगणा कॅडरकडे होता, जे देवजीच्या आत्मसर्मपणामुळे तुटला आहे.
2 मागील वर्षी 10 मोठे नक्षली म्होरके मारले गेले, ज्यात बसवा राजू समवेत 7 म्होरके तेलंगणातील होते, यामुळे नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली.
3 गुप्तचर अहवालानुसार आता झारखंडचा क्रूर नक्षली मिशिर बेसरा संघटनेची धुरा सांभाळू शकतो, हा मोठ्या बदलाचा संकेत आहे.
4 ओडिशा-छत्तीसगड सीमेवर सक्रीय बीबीएम डिव्हिजनच्या 15 नक्षलवाद्यांनी शस्त्रास्त्रs खाली ठेवण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र पाठविले आहे.
Comments are closed.