निवडणूक आयोगानेच आपल्या लोकशाहीची चेष्टा करून ठेवली आहे; आदित्य ठाकरे यांचा संताप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्रीय निवडणूक आयोगाने नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आसाम, केरळ, पद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ मे-जूनमध्ये संपत आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. तर इतर चार राज्यात एका टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पाचही राज्यांची मतमोजणी 4 मे राजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या पत्रकार परिषदेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासोनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की, निवडणुका निःपक्ष आणि पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावर आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडीयावर (इंस्टावर) पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, जेव्हा आपण मुख्य निवडणूक आयुक्तांच्या तोंडून “मुक्त, पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका” किंवा “निवडणूक आयोगाचे निःपक्षपाती कामकाज” यांसारखे शब्द ऐकतो… तेव्हा सुरुवातीला आपल्याला वाटते की आपण एखादा विनोदी कार्यक्रम पाहत आहोत; पण मग आपल्या लक्षात येते की, खुद्द निवडणूक आयोगानेच आपल्या लोकशाहीची चेष्टा करून ठेवली आहे, असे आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

Comments are closed.