हत्ती निघून गेला, त्याच्या शेपटीने अडकलेला …

कोणताही प्रकल्प वेळेत पूर्ण न करणे, हे आपल्या देशाचे वैशिष्ट्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार स्थापन झाल्यानंतर भारताने या वैशिष्ट्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्नाला प्रारंभ केला. त्यामुळे या सरकारच्या काळात अनेक प्रलंबित प्रकल्प पूर्ण झाले असून नवे प्रकल्पही वेळेत पूर्ण होत आहेत. तथापि, काही असे प्रकल्प आहेत की ज्यांची अवस्था हत्ती गेला आणि शेपूट अडकले अशी आहे. बिहारमधील मुंगेर येथे असा एक प्रकल्प आहे. हा 125 किलोमीटर लांबीचा प्रकल्प जवळपास पूर्ण झाला आहे. तथापि, केवळ 537 मीटरसाठी तो सध्या अडकलेला आहे. महमदा या गावाजवळ भूमी अधिग्रहण आणि भरपाई या दोन मुद्द्यांवर तो अडकला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा प्रकल्प हाती घेतला असून केवळ अर्धा किलोमीटरमुळे तो ठप्प झाला आहे. आता तो 2026 च्या प्रारंभापर्यंत पूर्ण करण्याचे नवे लक्ष्य प्राधिकरणाने ठेवले आहे. या प्रकल्पाचे अन्य भागांमधील काम वेगाने पूर्ण होत आहे. बरेचसे झालेली आहे. त्याचे उद्घाटन 2025 च्या उत्तरार्धात व्हायचे होते. तथापि, या 537 मीटर्समुळे सारी गाडी अहून बसली आहे. या अंतरासाठी हे प्रकरण न्यायालयात गेले असून तेथून ते कधी सुटणार याची प्रतीक्षा केली जात आहे. तसेच यंदा बिहारमध्ये पूरस्थिती अधिक काळ टिकल्याने हा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गात अडथळा आला आहे, असे समजत आहे. वास्तविक बिहारच्या विकासासाठी आणि मार्ग संपर्कासाठी हा महामार्ग प्रकल्प महत्वाचा आहे. त्याची रचनाही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आली आहे. जे काम झाले आहे, ते उत्तम असल्याच्या प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केल्या आहेत. तथापि, या ‘शेपटा’चे काय करायचे हा प्रश्न अद्यापही निरुत्तर आहे.

Comments are closed.