WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताच्या आशा जिवंत, जाणून घ्या समीकरण
सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) खेळली जात आहे. दरम्यान ही स्पर्धा भारतीय संघासाठी ‘जागतिक कसोटी चॅम्पियनशिप’ची (World Test Championship) फायनल फेरी गाठण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. 5 सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. त्यामध्ये विजय मिळवून भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनल फेरीचा मार्ग सुखद करू शकतो.
भारतीय संघाने मेलबर्न कसोटी गमावली, तर फायनल फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा अजूनही कायम राहतील. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचण्यासाठीचे समीकरण या बातमीद्वारे बातमीद्वारे जाणून घेऊया.
जर भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 3-1 ने विजय मिळवला, तर अशा स्थितीत भारतीय संघ थेट जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र ठरेल. म्हणजेच भारताला मेलबर्न कसोटी आणि त्यानंतर सिडनी कसोटीही जिंकावी लागेल.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारतीय संघाने 2-1 असा विजय मिळवला तर श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरूद्धची कसोटी अनिर्णित ठेवावी लागेल आणि पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करावे लागेल. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये 2-2 अशी बरोबरी राहिल्यास श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळवावा लागेल आणि पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेवर 2-0 असा विजय मिळवावा लागेल.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 1-1 अशी बरोबरीत संपली तर श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करावा लागेल. याशिवाय पाकिस्तानला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध 2-0 असा विजय मिळवावा लागेल.
भारतीय संघाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी गमावली, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे त्यांचे स्वप्न पूर्णपणे भंगणार आहे. आता भारतीय संघ बॉर्डर-गावसकर मालिका कशी संपवतो आणि जागतिक चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचण्यासाठी कशी वाटचला करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
नितीश आणि वॉशिंग्टनने रचला विक्रम, 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात हे पहिल्यांदाच घडलं
पोराला क्रिकेटर बनवण्यासाठी बापाने नोकरी सोडली! जाणून घ्या नितीश रेड्डीचा अंडर-14 पासून मेलबर्नपर्यंतचा प्रवास
MCG मध्ये नितीश रेड्डीचा फिल्मी अवतार, ‘पुष्पा’ नंतर ‘बाहुबली’ सेलिब्रेशन; पाहा VIDEO
Comments are closed.