ॲशेसमधील पराभवाचा फटका? इंग्लंडच्या प्रशिक्षकावर कारवाई करण्याची दिग्गज क्रिकेटपटूची मागणी
ॲशेस 2024-25 मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंग्लंडचा 3-0 असा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर, इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू जेफ्री बॉयकॉट यांनी मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्यावर कडक शब्दांत टीका केली आहे.
बॉयकॉट यांच्या मते, मॅक्युलम आणि स्टोक्सने इंग्लंड क्रिकेटला नवी दिशा दिली हे मान्य आहे, पण आता त्यांची आक्रमक खेळण्याची ‘बॅझबॉल’ (Bazball) पद्धत अपयशी ठरत आहे. सध्याच्या संघात व्यावहारिक विचारांची जागा घमंडाने घेतली आहे. मॅक्युलम आणि स्टोक्स अशा माणसांसारखे वागत आहेत जे चुकीच्या ठिकाणी खड्डा खोदत आहेत. जर तुमची रणनीती काम करत नसेल, तर ती थांबवायला हवी, असे बॉयकॉट म्हणाले.
त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, इंग्लंडला आता बदलाची गरज आहे. मी असतो तर सर्वात आधी प्रशिक्षक बदलला असता. मोठ्या संघांविरुद्ध हे दोघेही अपयशी ठरत आहेत. आता बोर्डाने कडक पावले उचलण्याची वेळ आली आहे.
बॉयकॉट यांनी प्रशिक्षकपदासाठी काही पर्यायही सुचवले आहेत. जेसन गिलेस्पी त्यांनी यॉर्कशायर संघासोबत चांगले काम केले आहे. ॲलेक स्टीवर्ट, इंग्लंडचाच एखादा अनुभवी व्यक्ती प्रशिक्षक म्हणून हवा असेल, तर स्टीवर्ट योग्य आहेत.
बॉयकॉट यांनी बेन स्टोक्सलाही (Ben Stocks) ताकीद दिली आहे. त्यांनी म्हटले की, स्टोक्सने आपल्या फलंदाजीच्या विचारसरणीत बदल केला पाहिजे. जर तो आपल्या पद्धतीशी तडजोड करण्यास तयार नसेल, तर इंग्लंडने आता नवीन कर्णधाराचा विचार करायला हवा.
5 सामन्यांच्या या ॲशेस मालिकेत इंग्लंडने पहिले तीनही सामने गमावले आहेत. पहिले दोन सामने त्यांनी 8 विकेट्सनी गमावले, तर तिसऱ्या सामन्यात कडवी झुंज देऊनही त्यांना 82 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. अजून दोन कसोटी सामने बाकी आहेत.
Comments are closed.