“सेमीफायनलपूर्वी महाभारत! भारताच्या सामन्यावर ठरेल तीन संघांचे भविष्य”

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय संघाची सुरुवात शानदार झाली. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा पराभव करत, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा चांगलाच धुवा उडवला. भारतीय संघाने त्यांचा सेमीफायनल सामन्यामध्ये जाण्याचा मार्ग पक्का केला आहे. तत्पूर्वी सेमीफायनल सामन्यापूर्वी भारतीय संघाला एक महत्त्वाचा सामना खेळायचा आहे. त्यावरूनच भारतीय संघाच पुढच भविष्य ठरणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी मधील भारतीय संघाचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध आहे  या सामन्यावरूनच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पॉईंट्स टेबलची दिशा ठरेल. या सामन्यावर ब गट मधल्या सेमीफायनललिस्ट संघांच्या नजरा असणार आहेत. कारण फक्त भारत किंवा न्यूझीलंड नाही तर ब गट मधील सेमीफायनललिस्ट संघाचे नशीब त्यावरूनच ठरणार आहे की कोणता संघ सेमीफायनल कोणत्या संघाविरुद्ध आणि कुठे खेळेल.

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 2 मार्च रोजी दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. नाणेफेक 2 वाजता होईल. सामना दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. अ गटातील हा शेवटचा सामना असेल. तसेच या सामन्यानंतर 4 आणि 5 मार्च रोजी पहिला आणि दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाईल.

भारत आणि न्यूझीलंडच्या या सामन्यावरून अन्य संघाचे भविष्य आणि पुढचे वेळापत्रक अवलंबून असणार आहे. याच सामन्यावरून ब गटातील दोन संघ सेमीफायनल सामन्यात खेळतील. पण अजून हे ठरलं नाही की त्यांना सेमीफायनल सामना कोणत्या संघा सोबत आणि कुठे खेळायचा आहे.

जर भारतीय संघाने सामना जिंकला तर त्यांचा पुढचा सामना ब गटातील पॉईंट्स टेबलवर असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या संघासोबत होईल. तसेच भारतीय संघाचा सामना 2 मार्च रोजी दुबईत होणार आहे. तत्पूर्वी कोणालाही माहिती नाही की, सेमीफायनल सामन्यासाठी दुबईमध्ये पोहोचणारा दुसरा कोणता संघ असणार आहे.

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियम मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. यातील एक संघ तर न्यूझीलंड आहे. पण दुसरा संघ कोणता असेल हे भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर ठरणार आहे.

हेही वाचा

“आमची मदत धोनीही करू शकत नाही!” – पाक महिला संघाच्या माजी कर्णधाराचा संताप

IND vs NZ: ‘मोहम्मद शमीला विश्रांती द्या आणि… ‘, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यापूर्वी माजी क्रिकेटपटूचा सल्ला

या हंगामात माहीचा मास्टरस्ट्रोक, नवी बॅट करणार कमाल!

Comments are closed.