'धुरंधर' हा चित्रपट लडाखमध्ये करमुक्त आहे.
लेफ्टनंट गव्हर्नर कविंदर गुप्ता यांची घोषणा
► वृत्तसंस्था/ श्रीनगर
केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये रणवीर सिंग यांचा ‘धुरंधर’ चित्रपट करमुक्त घोषित करण्यात आला आहे. उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवत जगभरात 1,100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. चित्रपटाचे अनेक भाग लडाखमध्ये चित्रित करण्यात आले आहेत. या चित्रपटात लडाखच्या भव्य आणि सुंदर ठिकाणांचे आकर्षक पद्धतीने प्रदर्शन केल्यामुळे चित्रपट निर्मात्यांना येथे चित्रीकरण करण्यास प्रोत्साहन मिळेल, असे उपराज्यपाल कविंदर गुप्ता यांनी सांगितले. या निर्णयामुळे पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. लडाख प्रशासन नवीन चित्रपट धोरणावर काम करत असून भविष्यात चित्रपट निर्मात्यांना पूर्ण सहकार्य करेल, असेही ते पुढे म्हणाले.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास एक महिन्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सूचनांनुसार चित्रपटात काही बदल करण्यात आले आहेत. मंत्रालयाने चित्रपटाला दोन शब्द म्यूट करण्यास आणि एका संवादात बदल करण्यास सांगितले. त्यानंतर, चित्रपट निर्मात्यांनी एक नवीन, संपादित आवृत्ती तयार केली. ही सुधारित आवृत्ती 1 जानेवारीपासून जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
Comments are closed.