‘हेरा फेरी 3’ चित्रपट अडकला कायद्याच्या कचाट्यात, दिग्दर्शक प्रियदर्शन म्हणाले…
अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या आगामी ‘हेरा फेरी ३’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेमध्ये आहे. परंतु आता मात्र या चित्रपटातील राजू, श्याम आणि बाबुराव या तिघांना पुन्हा एकदा पाहण्यासाठी प्रेक्षकांना मात्र वाट पाहावी लागणार आहे. ‘हेरा फेरी ३’ चे शूटिंग या वर्षी सुरू होणार नाही. परिणामी, अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल यांच्या ‘हेरा फेरी ३’ च्या प्रदर्शनाला विलंब होऊ शकतो. चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी पुष्टी केली आहे की, या वर्षी चित्रपटाचे शूटिंग सुरू होण्याची शक्यता नाही. विशेष म्हणजे चित्रपटाचे काम आधीच सुरू झाले होते, परंतु कायदेशीर गुंतागुंत आणि हक्कांच्या वादामुळे हे चित्रिकरण थांबले आहे.
नुकत्याच दिलेल्या ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शन यांनी परिस्थिती स्पष्ट केली आणि सांगितले की, हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचे आहे. त्यांनी सांगितले की काही लोक चित्रपटाच्या हक्कांवर दावा करत आहेत, तर काही संगीत हक्कांवरून वाद घालत आहेत. जोपर्यंत हे कायदेशीर वाद मिटत नाहीत तोपर्यंत चाहत्यांना आनंद देणारा हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता कमी दिसते.
‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या मार्गात कायदेशीर बाबी आल्याने, आता चित्रपट कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. म्हणूनच आता निर्माते जीपी विजयकुमार यांनी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांचा दावा आहे की फिरोज नाडियाडवाला नव्हे तर त्यांच्याकडे मूळ चित्रपटाचे हक्क आहेत.
Comments are closed.