आयपीएल 2025च्या वेळापत्रकात बदल, कधी आणि कुठे होणार फायनल सामना?

आगामी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) हंगामाची चाहत्यांना नक्कीच उत्सुकता लागली असेल. दरम्यान आता या हंगामाबाबत मोठे अपडेट समोर आले आहे. या स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल केले गेले आहेत. आयपीएलच्या या हंगामाची सुरूवात (14 मार्च) पासून होणार होती. पण आता ती (21 मार्च) पासून सुरू होईल. यासह, फायनल सामन्याची तारीख यावर देखील अपडेट मिळाले आहे. भारतातील क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी यावर माहिती दिली आहे.

स्पोर्ट्स स्टारच्या एका बातमीनुसार, आयपीएल 2025चा पहिला सामना (21 मार्च) रोजी खेळला जाईल. तर फायनल सामना (25 मे) रोजी खेळला जाईल. आयपीएलची ही स्पर्धा (14 मार्च) पासून सुरू होणार होती. पण आता वेळापत्रक बदलले गेले आहे. हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियमला ​​एक मोठी संधी मिळणार आहे. पहिले 2 सेमीफायनल सामने याच मैदानावर खेळले जातील.

कोलकाता नाइट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएल 2024च्या ट्राॅफीवर तिसऱ्यांदा आपले नाव कोरले होते. त्यामुळे यंदाचा फायनल सामना ईडन गार्डन, कोलकाता येथे खेळवला जाईल. यासह, प्लेऑफ सामना देखील याच मैदानावर खेळवला जाईल. यासाठी भारतीय नियामक मंडळ (BCCI) लवकरच बैठक घेणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

PD Champions Trophy; भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा, मिळवला दणदणीत विजय
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी अफगाणिस्तान संघाची घोषणा, या खेळाडूवर सोपवली मोठी जबाबदारी
भारतीय संघानं मोडला 8 वर्ष जुना विक्रम, या खेळाडूनं ठोकलं करिअरचं पहिलं शतक

Comments are closed.